शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

निम्मं शहर शाहूपुरीत.....अख्खी जबाबदारी ‘सिटी’त!

By admin | Updated: August 7, 2014 00:13 IST

१२५ कर्मचारी : शाहूपुरी पोलीस ठाणे उचलणार २५ टक्के भार !

सातारा : नवीन शाहूपुरी पोलीस ठाणे काही दिवसांतच सुरू होणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र शाहूपुरीत नवीन पोलीस ठाणे कार्यरत झाले तरी शहर पोलीस ठाण्यावरील केवळ २५ टक्केच ताण कमी होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. औद्योगिक वसाहतीमधील पोलीस ठाणे मंजूर झाल्यास एकूण तीन पोलीस ठाणे होतील. या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी एकत्र मिळून काम केल्यास सातारा शहरातील गुन्हेगारी पूर्णपणे आटोक्यात येईल, असा विश्वास पोलिसांना आहे.शाहूपुरी पोलीस ठाणे कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे होते. जिल्हा पोलीस दलातर्फे शाहूपुरी आणि एमआयडीसी पोलीस ठाणे, असे दोन प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी शासनाने शाहूपुरी पोलीस ठाण्याला मंजुरी दिली. नवीन पोलीस ठाणे शाहूपुरी ग्रामपंचायतीशेजारील एका इमारतीमध्ये सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शाहूपुरी पोलीस ठाणे प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यावरील कामाचा ताण किती कमी होईल, याचा शोध घेतला. त्यावेळी अनेक समस्या आणि काही चांगल्या बाबीही समोर आल्या. शहर पोलीस ठाणे ते शाहूपुरी सुमारे तीन किलोमीटर अंतर आहे. शाहूपुरीतील मुख्य चौकापासून चारीबाजूला सुमारे दोन किलोमीटरपर्यंत शाहूपुरीचा विस्तार झाला आहे. शाहूपुरीमधील यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत या परिसरातील गुन्ह्यांचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले होते. त्यामध्ये चोरी आणि लूटमार या गुन्ह्यांचा त्यामध्ये समावशे होता. या गुन्ह्यांचे प्रकार वाढल्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाणे मंजूर व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्याला हिरवा कंदील दाखविला. शाहूपुरी पोलीस ठाणे स्वतंत्र झाल्यानंतर केवळ २५ टक्केच ताण शहर पोलीस ठाण्यावरील कमी होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शहराचा मध्यभाग या नवीन पोलीस ठाण्यात समाविष्ठ करण्यात आला आहे. त्यामुळेही बराच फरक पडणार आहे.राजवाड्यापासून वरच्या भागात गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. मारामारी, दरोडे, चोरी, मालमत्तेचे गुन्हे या परिसरामध्ये वारंवार घडत आहेत. त्यामुळे या नवीन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर हे सर्व गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीचा परिसर प्रचंड मोठा आहे.संगम माहुलीपासून औद्योगिक वसाहत, शिवराज पेट्रोलपंप ते वाढे फाटा, असा परिसर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे शहर पोलिसांना प्रचंड पळापळ करावी लागते. (प्रतिनिधी)‘शाहूपुरी पोलीस ठाणे मंजूर होणे अत्यंत महत्त्वाचे होते. शहराचा निम्मा भाग त्या पोलीस ठाण्यात समाविष्ट झाला तरी शहर पोलीस ठाण्यावरील बराचसा ताण कमी होईल, पोलिसांना काम करणेही सोपे जाईल तसेच गुन्ह्यांचे प्रमाणही आटोक्यात येईल.’- राजीव मुठाणे, शहर पोलीस निरीक्षक करंजे ते बोगदा...शाहूपुरी हद्दीत !शाहूपुरी पोलीस ठाण्याला १२५ कर्मचाऱ्यांचा ताफा मंजूर झाला असून, या नवीन पोलीस ठाण्याची हद्द निश्चित करण्यात आली आहे. संपूर्ण शाहूपुरी, राजवाडा परिसर, बोगदा परिसर, मोती चौक, बुधवार नाका, राधिका रोड, करंजे, बसस्थानक परिसराचा पाठीमागील परिसर असा भाग शाहूपुरी पोलीस ठाण्यात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यावरील ताण थोडातरी हलका होणार आहे.