शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही राजेंच्या मावळ्यांचा शहर हद्दवाढीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीला खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मावळ्यांनीच विरोध केला आहे. मंगळवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत हद्दवाढीला विरोध करणारा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. गटविकास अधिकाºयांच्या अभिप्रायासह हा ठराव जिल्हा परिषदेला सादर करण्यात येणार आहे.पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी सभापती मिलिंद कदम ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीला खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मावळ्यांनीच विरोध केला आहे. मंगळवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत हद्दवाढीला विरोध करणारा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. गटविकास अधिकाºयांच्या अभिप्रायासह हा ठराव जिल्हा परिषदेला सादर करण्यात येणार आहे.पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी सभापती मिलिंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी अमिता गावडे यांची उपस्थिती होती. शाहूपुरी, खेड, विलासपूर, आदी गावांचा हद्दवाढीनंतर साताराशहरात समावेश होणार आहे. सभेच्या सुरुवातीलाच हद्दवाढीचा विषय निघाला. खासदार उदयनराजे गटाचे सदस्य संजय पाटील यांनी शाहूपुरी गावचा हद्दवाढीत समावेश करू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सातारा शहरातील नागरिकांनाच सुविधा मिळत नाहीत. आमच्या ग्रामपंचायती विकासासाठी सक्षम आहेत. ग्रामसभेने हद्दवाढीला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे.तसेच जिल्हाधिकाºयांकडे हरकतही नोंदविली आहे. सातारा नगरपालिका नागरिकांना योग्य सुविधा देऊ शकत नाही. शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत स्वतंत्र पोलीस ठाणे, गावासाठी स्वतंत्र पोस्ट आॅफिस, आदी सुविधा असून, शाहूपुरीसाठी स्वतंत्र २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनादेखील थोड्याच कालावधीत सुरू होणार आहे. साताºयातील एका सेवाभावी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच शाहूपुरी ग्रामपंचायतीचा नगरपालिका हद्दवाढीत समावेश होऊ नये व ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे, यासंदर्भात शाहूपुरीतील ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे शाहूपुरीला स्वतंत्र नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.हाच मुद्दा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे सदस्य आशुतोष चव्हाण यांनीही उचलून धरला. खेड, विलासपूर व लगतचा त्रिशंकू भाग यांचा समावेश शहराच्या हद्दीत होऊ नये, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. तसेच खेड आणि विलासपूर या दोन्ही ग्रामपंचायतींची मिळून नगरपंचायत स्थापन करण्यात यावी, असा ठराव यावेळी मांडला. या दोन्ही ठरावांना सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.तालुक्यात ३० ते ३५ अंगणवाड्यांना शासनाने मंजुरी दिली आहे; पण जागाच उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली असून, हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे मत सभापती मिलिंद कदम यांनी व्यक्त केले. जागा उपलब्ध झाल्यास इमारत उभारणी करून विद्यार्थ्यांची सोय त्या ठिकाणी करता येणार आहे.यावेळी झालेल्या अरविंद जाधव, राहुल शिंदे, हणमंत गुरव, दयानंद उघडे, विजया गुरव यांनी सहभाग घेतला. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी बहुतांश सदस्यांनी केली. जिल्हा परिषदेचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहत नसल्याची तक्रार यावेळी सभापतींकडे करण्यात आली. त्यामुळे इथून पुढच्या सभांना सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी उपस्थित राहण्याबाबत नोटीस काढावी, अशा सूचना सभापती मिलिंद कदम यांनी प्रशाासनाला केल्या.