शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सुनावणीला नागरिकांचीच दांडी

By admin | Updated: December 26, 2014 23:44 IST

मलकापूर शहरात प्रथमच मूल्यवर्धित करआकारणी लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मलकापूर : मूल्यवर्धित कर आकारणी विरोधात मलकापुरात एकूण तीन हजार शंभरपेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या आहेत. तीन टप्प्यांत होणाऱ्या सुनावणीत आज पहिल्या दिवशी हजार हरकती सुनावणीसाठी घेण्यात आल्या. मात्र, हजार हरकतदारांपैकी फक्त ५०१ हरकतदारच प्रत्यक्ष हजर राहिले. नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही केवळ पन्नास टक्के उपस्थिती असणे नागरिकांतील उदासीनता दर्शवत आहे. मलकापूर शहरात प्रथमच मूल्यवर्धित करआकारणी लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत शहरातील सर्व मिळकतदारांना कर योग्य मूल्याच्या नोटीसही देण्यात आल्या होत्या. नोटीसमधील अवास्तव कराच्या रकमा पाहिल्यानंतर शहरातून उठाव झाला. या प्रस्तावित कर प्रणालीच्या विरोधात हरकती दाखल करण्यासाठी २५ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. तर काहीना २६ डिसेंबर मुदत देण्यात आली होती. आज (दि. २६ डिसेंबर) रोजी प्रथम एक हजार हरकतींवर सुनावणी होणार असल्याचे पत्रही हरकतदारांना देण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता सुनावणीस प्रारंभ झाला. दिवसभरात हजार हरकतदारांपैकी ५०१ हरकतदारांनी प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडले. या करप्रणालीवर हरकत असल्याची सर्वेक्षणात अनेक चुका असल्याचे निदर्शनास आणून दिले. नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न ऐरणीवर असताना फक्त पन्नास टक्केच नागरिकांनी उपस्थिती दाखविणे, ही नागरिकांमध्ये असलेली उदासीनता दाखवित आहे. या सुनावणीसाठी नगररचना विभागाचे सहायक संचालक श्रीकांत देशमुख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)नागरिक वंचितमलकापूर शहरातील सोयी, सुविधांचा विचार करता मुंबईस्थित अनेक नागरिकांनी गुंतवणूक म्हणून मिळकती खरेदी केलेल्या आहेत. करप्रणालीबाबत नेमके काय निकष आहेत, हे कळेपर्यंतच हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत संपली. त्यामुळे अनेक नागरिक हरकती दाखल करण्यापासून वंचित राहिले आहेत.