शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इंधन बचतीला हातभार; 'या' शहरातील बहुतांशी नागरिक वापरतात अपारंपरिक ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 17:25 IST

मलकापूर : शहरातील २ हजार ५० घरात सोलार बंबाचा वापर होत असून नागरिकांनी इंधन बचतीला चांगलाच हातभार लावला आहे. ...

मलकापूर : शहरातील २ हजार ५० घरात सोलार बंबाचा वापर होत असून नागरिकांनी इंधन बचतीला चांगलाच हातभार लावला आहे. अपारंपरिक ऊर्जा वापरातून वार्षिक ९ हजारांवर गॅस सिलिंडरची बचत होत आहे. त्यामुळे पाणी तापवण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची अप्रत्यक्षरीत्या बचत झाल्याने मोलाचा हातभार लागत आहे.

मलकापूर सोलार सिटी प्रकल्पाद्वारे शहरात जास्तीत जास्त सोलार ऊर्जेचा वापर करण्याचा पालिकेने प्रसार केला. प्रोत्साहन देण्यासाठी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ साली १ कोटी ८ लाखांचा निधी दिला होता. या निधीमधून तत्कालीन नगरपंचायतीने शासनाच्या सबसिडी बरोबरीने सूट देत पहिल्या टप्प्यातच सातशेपेक्षा जास्त घरांवर सोलार बंब बसवले. तर त्यापूर्वीच काही वैयक्तिक मिळकतदारांनी सोलार बंबाचा वापर सुरू केला होता. या सर्वांच्या अपारंपरिक ऊर्जा वापराने झालेले फायदे विचारात घेता व शासनाची सबसिडी, पालिकेच्या प्रोत्साहन अनुदानाचा फायदा घेण्यासाठी शहरातील इतर मिळकदारांनीही आपल्या घरावर सोलार बंब बसवले.२०१८ अखेर २ हजार घरांवर सोलार बंबाचा वापर सुरू झाला. आजअखेर शहरात २ हजार ५० घरांत सोलार बंबाचा वापर होत असल्यामुळे इंधन बचतीला हातभार लागला आहे. नागरिकांकडून झालेल्या अपारंपरिक ऊर्जा वापरामुळे वार्षिक ९ हजारांवर गॅस सिलिंडरची बचत होत आहे. पाणी तापवण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत झाल्याने पर्यावरण संवर्धन होण्यास मदत झाली आहे.सोलार बंबावरील अनुदान सुरू करावे!इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर सौर ऊर्जाचा वापर उत्तम नमुने होऊ शकतात. यासाठी प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. शासनाने सोलार बंबाचे अनुदान अचानक बंद केले. तर निधीअभावी पालिकेचेही प्रोत्साहन अनुदान बंद झाले. त्यामुळे सोलार बंब बसवणारांची संख्या मंदावली. सर्वत्र सोलर उपकरणांचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शासन व पालिकेने प्रोत्साहन अनुदान सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर