शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

चूल, मूल ही झूल उतरली!

By admin | Updated: February 4, 2015 23:53 IST

महिलाराज : सायगाव विभागात महिला ग्रामसभा फुल्ल

सायगाव : पंचायत राज व्यवस्थेमधील आजवर दुर्लक्षित राहिलेल्या महिला ग्रामसभांना यावेळी झालेल्या महिला ग्रामसभा अपवाद ठरल्या आहेत. सायगाव विभागातील विविध गावांमधून महिलांची अभूतपृर्व उपस्थिती मिळाल्याने भविष्यात ‘महिला राज’ ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.नुकत्याच झालेल्या महिला ग्रामसभांना महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. महिगाव गावात शंभरच्या आसपास तर दुदुस्करवाडीसारख्या छोट्या गावातही सत्तर ते ऐंशी महिला उपस्थित होत्या. परंपरेने आलेली चूल आणि मूल ही झूल उतरवून बहुसंख्येने पावलं महिला ग्रामसभांकडे वळताना दिसली.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांचे स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून सक्षमीकरण सुरू आहे. गावोगावी गरीब महिलांचे बचत गट स्थापन झाले आहेत. हे सर्व गट दशसूत्रीवर चालतात. ज्यातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण होत आहे. परिणामी कधी काळी महिला ग्रामसभा ही दुष्कर असणारी गोष्ट आता प्रत्यक्षात येत आहे.आता आमचे प्रश्न आम्हीच सोडविणार, असा संदेश या निमित्ताने तमाम महिलांनी दिला आहे. महिलांचा हा उत्साह पाहून या सकारात्मक बदलास समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. (वार्ताहर)गावातील प्रत्येक महिला ग्रामसभेपर्यंत येणे आणि तिने आपले प्रश्न धीटपणे मांडणे ही महिला सक्षमीकरणाची नांदी आहे.- जयश्री भोसले, सरपंच, महिगावमी समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) म्हणून बचत गटांना मदत व मार्गदर्शन करते. गरीब महिलांना गरिबीतून बाहेर पडण्याची प्रचंड इच्छाशक्ती असते. या अभियानाच्या माध्यमातून ती चालून आली आहे.- विजया जगताप, सीआरपी, सायगावशासनाने महिला बचत गटांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे महिला सामाजिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. पर्यायाने महिला ग्रामसभेस प्रचंड संख्येन महिला उपस्थित राहत आहेत. सायगाव विभागात नुकत्याच झालेल्या महिला ग्रामसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये आनेवाडी महिला ग्रामसभेस ११५, महिगाव ९०, दुदुस्करवाडी ८०, सायगाव ४५ तर दरे खुर्द येथे ३० महिला उपस्थित होत्या.