शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्युचं दु:ख बाजुला सारून केले अवयवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 14:28 IST

मुंबईच्या एका खासगी कंपनीत इंजिनिअर असलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आई, वडिलांसह कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; पण मुलाच्या मृत्युचं डोंगराएवढं दु:ख बाजुला सारून या कुटूंबाने त्याचे अवयव दान केले.

ठळक मुद्देनिगडीतील दाम्पत्याचा निर्णय : डोळे, किडनी, हृदय, लिव्हरमुळे दुसºया रूग्णांना जीवदान

आॅनलाईन लोकमतशामगाव (जि. सातारा) : मुंबईच्या एका खासगी कंपनीत इंजिनिअर असलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आई, वडिलांसह कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; पण मुलाच्या मृत्युचं डोंगराएवढं दु:ख बाजुला सारून या कुटूंबाने त्याचे अवयव दान केले. मुलाचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या अवयवाच्या रूपाने आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, असा विचार करीत या कुटूंबाने हा आदर्शवत निर्णय घेतला. कºहाड तालुक्यातील निगडी गावातील चंद्रकांत घोलप हे अल्पशिक्षित. शेती करायची म्हटलं तरी क्षेत्रही अल्प. त्यामुळे कंपनीत नोकरी करून चंद्रकांत हे आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. काही वर्षांपुर्वी ते पत्नी कुसुम व तीन आपत्यांसह उदरनिवार्हासाठी मध्यप्रदेशला गेले. त्याठिकाणी चंद्रकांत यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. या नोकरीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कुटूंबाला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वर्षांनी संबंधित कंपनी बंद पडली. पुन्हा या कुटूंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. मध्यप्रदेशमध्येच काहीकाळ मिळेल ते काम करून चंद्रकांत यांच्यासह कुटूंबियांनी गुजराण केली. अखेर पुन्हा हे कुटूंब मध्यप्रदेशातून नाशिकला गेले. त्याठिकाणी चंद्रकांत व कुसूम यांनी मोलमजुरी करून आपली दोन मुले व मुलीला शिकवले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मुलगी गायत्रीचे लग्नही झाले. तर मोठा मुलगा निलेश शिक्षण घेऊन नवी मुंबईतील कोपरखैरने परिसरात नोकरीनिमित्त वास्तव्यास गेला. त्याठिकाणी तो पत्नीसमवेत राहतो. चंद्रकांत व कुसूम यांचा धाकटा मुलगा लोकेश यानेही उच्च शिक्षण घेतले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तोही नवी मुंबईला भाऊ निलेशकडे राहण्यास गेला. त्याठिकाणी एका खासगी कंपनीत तो सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर काम करीत होता.गत गुरूवारी नेहमीप्रमाणे लोकेश आॅफीसला जाण्यासाठी निघाला. त्याचा मित्रही त्याला घेण्यासाठी घरापर्यंत आला. दोघेजण दुचाकीवरून कंपनीत जाण्यासाठी निघाले. मात्र, काही अंतरावरच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये लोकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाला. तेथील वाहतूक पोलिसांनी लोकेशला उपचारासाठी अपोलो रूग्णालयात दाखल केले. मात्र, तीन दिवसांनी तेथील डॉक्टरांनी लोकेशचा ‘ब्रेन डेड’ झाल्याचे सांगितले. त्यामुळे कुटूंबिय शोकसागरात बुडाले.दरम्यान, लोकेशचे अवयव दान करण्याचा सल्ला रूग्णालयातील डॉक्टरांनी कुटूंबियांना दिला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख असतानाही यावर विचार करून लोकेशच्या आई, वडील बहीण व भाऊ यांनी लोकेशचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकेशचे डोळे, दोन किडन्या, हृदय, लिव्हर या अवयवांची दानप्रक्रीया डॉक्टरांनी पूर्ण केली. तसेच लोकेशचे शव कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले. मृतदेहावर निगडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माझ्या मुलाच्या अवयवांमुळे चार जणांना जिवदान मिळाले. अवयव दानाचा निर्णय माझ्यासह कुटूंबियांसाठी खुप अवघड होता; पण लोकेशच्या अवयवांमुळे आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, या जाणिवेतून आम्ही हा निर्णय घेतला. - चंद्रकांत घोलप, लोकेशचे वडील