शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून बालकाचा खून ; मृतदेह विहिरीत फेकून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:41 IST

फलटण : जमिनीच्या हव्यासापोटी सात वर्षीय चिमुकल्याचा नात्याने मामा असलेल्या एकाने गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून ...

ठळक मुद्दे सपकळवाडीत खळबळ

फलटण : जमिनीच्या हव्यासापोटी सात वर्षीय चिमुकल्याचा नात्याने मामा असलेल्या एकाने गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची दुर्दैवी घटना फलटण तालुक्यातील सपकळवाडी येथे घडली. याप्र्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे. कल्पेश भाऊसाहेब सपकळ असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, कल्पेश सपकळ हा बुधवार, दि. ३० पासून बेपत्ता होता. यामुळे कल्पेशची आई रंजना यांनी गुरुवार, दि. ३१ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचा शोध घेत होते.तपास करीत असताना गावातील काही लोकांनी कल्पेश यास नात्यातील पांडुरंग सदाशिव घाडगे (वय ३७, रा. सपकळवाडी, मूळगाव चिंचणी, ता. खटाव) याच्यासोबत पाहिले. तसेच त्याचा पूर्व इतिहास गुन्हेगारी स्वरुपाचा असल्याचे सांगितले.

त्या माहितीवरून पोलिसांनी संशयित पांडुरंग घाडगे यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत ‘जमिनीच्या हव्यासापोटी बुधवार, दि. ३० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कल्पेशला वडापाव खायला देतो, असे आमिष दाखवून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने पळवून नेले. त्याचा सपकळवाडी येथील ओढ्याकडेला असलेल्या शेताजवळ नेऊन नाक, तोंड, गळा दाबून खून केला. पुरावा नाहीसा करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकला,’ अशी माहिती दिली. पोलिसांनी घाडगेसोबत विहिरीत पाहिले असता कल्पेशचा मृतदेह आढळून आला. पांडुरंग घाडगे यास अटक केली.वडापाव देऊन अपहरणभाऊसाहेब आणि रंजना सपकळ यांना कल्पेश हा एकुलता एक मुलगा होता. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी कल्पेशचा जन्म झाला. भाऊसाहेब यांच्या नावावर पाच एकर शेती होती. कल्पेशचे वडील भोळसट स्वभावाचे असल्याने ‘भाऊसाहेब यांच्या बहिणीचा नवरा असलेल्या पांडुरंग घाडगे याची बºयाच वर्षांपासून जमिनीवर नजर होती. वारसाहक्काने भविष्यात ही जमीन कल्पेशला मिळणार असल्याने जमिनीच्या हव्यासापोटी पांडुरंगने कल्पेशचा खून केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक ए. आर. मांजरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMurderखून