शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

नोंदणीला बालचमूंचा भरघोस प्रतिसाद

By admin | Updated: August 7, 2014 00:15 IST

बालविकास मंचच्या प्रत्येक सभासदास यावर्षी मनोरंजनाच्या भरघोस मेजवानीसोबत मोफत सुविधा आणि लकी ड्रॉमधून अनेक बक्षिसे

सातारा : वेगवेगळ्या स्पर्धांची, भन्नाट मनोरंजनाची, वाढत्या कॉन्फिडन्सची धम्माल असलेल्या ‘लोकमत बालविकास मंच’च्या या वर्षातील सभासद नोंदणीचा शुभारंभ येथील विविध शाळांमध्ये थाटात झाला आहे. २०१४-१५ च्या सदस्य नोंदणीत विद्यार्थ्यांना ‘हमखास गिफ्ट’ आणि ‘सक्सेस स्टोरीज’ हे पुस्तक देण्यात आले आहे.बालविकास मंचच्या प्रत्येक सभासदास यावर्षी मनोरंजनाच्या भरघोस मेजवानीसोबत मोफत सुविधा आणि लकी ड्रॉमधून अनेक बक्षिसे मिळविता येणार आहेत. १५० रुपये इतके अल्प सभासद शुल्क भरून प्रत्येक सभासदाला १५४ रुपये किमतीची वॉटर बॉटल, १०० रुपये किमतीचे ‘सक्सेस स्टोरीज’ पुस्तक मोफत मिळणार आहे. याशिवाय अमर सायकल एजन्सीच्या फायरफॉक्स बाईक स्टेशनमार्फत ८,००० रुपये किमतीची स्पोर्टस् सायकल लकी ड्रॉमधून जिंकता येणार आहे. सोबतच ‘राहुल ज्यूस सेंटरच्या सौजन्याने ३० भाग्यवान सदस्यांना वाढदिवसानिमित्त चार व्यक्तींना मँगोशेक मोफत मिळणार आहे. तर हमखास बक्षिसांमध्ये प्रत्येक सभासदाला सिटी सेंटरतर्फे १५० रुपयांचे खरेदी कूपन मिळणार असून, खरेदीवर हमखास भेटवस्तूदेखील मिळणार आहे. सभासदांच्या मातेला सलोनी ब्युटीपार्लरच्या वतीने १५० रुपयांचे हेअरकट सुविधा मोफत मिळणार आहे आणि लायन्स क्लब आॅफ सातारा कॅम्प संचलित नॅब हॉस्पिटलमार्फत डोळ्यांची तपासणी आणि चष्मा लागला असल्यास नंबरचा चष्मा एम्पथी फाउंडेशनमार्फत मोफत दिला जाणार आहे. सभासद झाल्यानंतर केवळ १५० रुपयांमध्ये जवळपास २५४ रुपयांच्या भेटवस्तू आणि जवळपास ६०० रुपयांच्या मोफत सुविधा सभासदांना मिळणार आहेत. नर्सरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी बालविकास मंचमध्ये सहभागी होऊ शकतात. या सभासद नोंदणीचे फॉर्म गुरुकुल स्कूल, रयत इंग्लिश मीडियम स्कूल, अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सेंट पॉल्स स्कूल, श्रीपतराव पाटील हायस्कूल, दात्तार शैंदुरे इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. जे डब्लू. आर्यन अ‍ॅकॅडमी, अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय या शाळांमध्ये वितरित केले आहे. शहरातील इतर शाळांमध्येही येत्या काही दिवसांत नोंदणीचे फॉर्म वितरित करण्यात येईल. सभासद होण्यासाठी ‘लोकमत’ कार्यालय, गुरुअलंकार कॉम्प्लेक्स, शेटे चौक, गुरुवार पेठ, सातारा येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)