शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

आईचा बुरखा चाकात अडकल्याने मुलाचा मृत्यू; तळबीड परिसरातील घटना

By दत्ता यादव | Updated: December 30, 2023 20:41 IST

दहा दिवसांनंतर मृत्यूशी झुंज अपयशी

सातारा : मुलाला मदरशामध्ये प्रवेश घेण्यासाठी जात असताना दुचाकीवर मागे बसलेल्या आईचा बुरखा अचानक चाकात अकडला.  त्यामुळे दुचाकीवरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कऱ्हाड तालुक्यातील तळबीड परिसरात घडली. हा अपघात दि. १९ डिसेंबर रोजी झाला.

जाफर सैफन शेख (वय २३, रा. मुजावर काॅलनी, शनिवार पेठ, सातारा) असे दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तळबीड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जाफर हा त्याच्या लहान मुलाला उंब्रज परिसरातील मदरशामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याच्या आईसोबत दुचाकीवरून जात होता. तळबीड परिसरात आल्यानंतर पाठीमागे बसलेल्या त्याच्या आईचा बुरखा मागील चाकात अडकला. त्यामुळे दुचाकी चालवत असलेला जाफर उडून पुढे पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तर त्याचा मुलगा आणि आई सुद्धा यात किरकोळ जखमी झाली. जाफरला तातडीने कऱ्हाड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेली त्याची मृत्यूशी झुंज अखेर दि. २९ रोजी दुपारी एक वाजता अपयशी ठरली. तळबीड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, सहायक फाैजदार शशिकांत खराडे हे अधिक तपास करीत आहेत.  

सतर्कता महत्त्वाची...

दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या महिलांनी साडी, बुरखा व्यवस्थित  आहे  का,  हे  पाहणे  गरजेचे  आहे.  अचानक  अशाप्रकारचे  अपघात  कधीही होऊशकतात. हे टाळण्यासाठी सतर्कता महत्त्वाची आहे, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात