शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिकन गुनिया सदृश साथीचे फलटणला अकरा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 14:17 IST

चिकन गुनिया सदृश साथीच्या आजाराने त्रस्त असलेले अकरा रुग्ण फलटण शहरात आढळले. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना पत्राद्वारे केल्या आहेत.

ठळक मुद्देआजार पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीती उपाययोजना करण्याची आरोग्य विभाग आणि नगर परिषदेकडे मागणीसाथ नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना

फलटण : चिकन गुनिया सदृश साथीच्या आजाराने त्रस्त असलेले अकरा रुग्ण फलटण शहरात आढळले. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना पत्राद्वारे केल्या आहेत.

शहराच्या अन्य भागातही चिकन गुनिया व तत्सम आजाराचे संशयित रुग्ण आढळले. फलटण शहरासह तालुक्यात महिन्यापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. यावर्षी तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे पाणी साठून राहणे, गटारी, नाले तुंबून राहतात.

शहरातील पाणी पुरवठ्याच्या मुख्य वितरण नलिका बदलण्यात आल्या असल्या तरी छोट्या जलवाहिन्या अनेक वर्षांच्या असल्याने शहराच्या अनेक भागांत त्या गंजलेल्या, फुटलेल्या आहेत. त्यामधून गटारातील किंवा अन्य ठिकाणी साठलेले पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने एकीकडे वातावरण दुषित, दुसरीकडे डासांचे साम्राज्य आणि तिसरीकडे अस्वच्छ पाणी पुरवठा यामुळे यासारखे आजार पसरत असल्याचे सांगितले जाते. राज्य शासनाचा आरोग्य विभाग आणि नगर परिषदेने ठोस भूमिका घेऊन कार्यवाही करण्याची मागणी शहरवासियांमधून होत आहे.

याबाबत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी पत्राद्वारे या गंभीर बाबीची माहिती मुख्याधिकाºयांना दिली आहे. तसेच कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत सूचित केल्या. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाºयांनी शहरातील सर्व प्रभागात नगर परिषद कर्मचाºयांची नेमणूक करून योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.तुंबलेली गटारे वाहती करणे, शहरातील छोटे खड्डे बुजविणे, जंतूनाशकांची फवारणी करणे आदी कामे हाती घेण्यात येत आहे.जनतेत जाऊन जनजागृतीघरोघरी जाऊन पाणी साठवण टाक्यांमध्ये डासांच्या आळ्या व अंडी नष्ट करणारी औषधे टाकणे, पाण्याचा साठा न करण्याबाबत तसेच पाणीसाठा करण्यात येणारी भांडी, हौद आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून रिकामा ठेवण्याबाबत, तसेच निरुपयोगी साहित्य, टायर, भंगार व फुटक्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याबाबत नागरिकांना सूचना करण्यात येत असल्याचे मुख्याधिकाºयांनी सांगितले.कागदी घोडे न नाचविण्याची मागणीचिकन गुनिया सदृश आजाराबाबत आरोग्य विभाग व पालिकेने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा प्रत्यक्ष रुग्ण कोणत्या भागात किती आहेत? ते कोणत्या रुग्णालयात उपचार घेत आहेत? त्यांची सध्यस्थितीची माहिती देऊन नागरिकांना अधिक सजग करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.