शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

जिल्ह्यातील चौकांमध्ये बुध्दिबळाचे आयलँड

By admin | Updated: September 7, 2016 23:54 IST

शेखर गायकवाड : भाऊसाहेब पडसलगीकर क्रीडा पुरस्कार प्रदान

सातारा : गणेशमूर्तीच्या आगमनावेळी मिरवणुकीत झालेल्या वादातून दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या गटात तलवार, दगड आणि काठीने तुंबळ हाणामारी झाली. ही घटना येथील मंगळवार पेठेतील कोल्हटकर आळीमध्ये मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. यामध्ये नऊजण जखमी झाले असून, २३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.मंगळवार पेठेतील न्यू राजहंस गणेश मंडळ आणि होलार समाज सार्वजनिक गणेश मंडळाची गणेशमूर्ती सोमवारी वाजत-गाजत मिरवणुकीने आणण्यात येत होती. यावेळी पुढे जाण्याच्या कारणावरून या दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली होती. हा वाद दोन्ही मंडळांनी सामोपचाराने मिटविलाही होता; परंतु मंगळवारी रात्री पुन्हा या दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते कोल्हटकर आळीत एकत्र आले. मिरवणुकीत झालेल्या प्रकाराबाबत शाब्दिक वाद वाढत गेल्याने दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. तलवार, दगड आणि काठीने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कोल्हटकर आळीत एकच हल्लकल्लोळ माजला. आरडाओरडमुळे पेठेतील नागरिक जागे झाले. काहींनी शाहूपुरी, तर काहींनी सातारा शहर पोलिस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांची धरपकड केली. दोन्ही गटांतील एकूण २३ जणांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)मिरवणुकीस मज्जाव! या वादावादीमुळे दोन्ही मंडळांचा परवाना पोलिसांनी रद्द केला असून, विसर्जनादिवशी या मंडळांनी कसलीही मिरवणूक काढायची नाही. शांततेत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे.हे कार्यकर्ते झाले गजाआड : शिवाजी सांडगे (वय २३), दिगंबर सांडगे, विजय नलवडे (२६), प्रशांत तोरणे (१९), गणेश अहिवळे (२९), सौरभ जमदाडे (२४), रवी माने (२९), राहुल कटवळे (२२), चेतन गेजगे, विक्रम आवटे हे सर्वजण मंगळवार पेठेत राहणारे असून, न्यू राजहंस गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत. विजय केंडे, गणेश केंडे, शुभम ढाणे (२३, रा. चिमणपुरा पेठ), मेझशाम केंडे, अतुल बागवान, श्रीकृष्ण पिलावरे (३३), संजय केंडे (१९), ज्ञानेश्वर नलवडे (४३), प्रसाद नलवडे (२८, सर्व रा. मंगळवार पेठ) हे कार्यकर्ते होलार समाज सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत.