शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शाहू महाराजांचे संशोधन केंद्र साताऱ्यात व्हावे, डॉ. भारत पाटणकरांनी केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 19:52 IST

या मागणीची पूर्तता शासनाने न केल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला दिला.

सातारा : शंभूपुत्र आणि संपूर्ण भारतभर मराठा साम्राज्याची पताका फडकविणारे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचेही भव्य स्मारक पुणे येथे शनिवारवाडा आणि साताऱ्यात संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या मागणीची पूर्तता शासनाने न केल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला दिला.डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, पैठण धर्मपीठाच्या विरोधामुळे छत्रपती शिवरायांना वेदोक्त आणि पुराणोक्त असा दोन वेळा राज्याभिषेक करावा लागला. जाती व्यवस्थेला व वतनदारीला रयतेच्या हितासाठी विरोध हे शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांनी अंमलात आणले. महाराणी येसूबाई यांना संभाजीराजांनी श्री सखी राज्ञी जयती अशी स्वतंत्र अधिकाराची मोहोर दिली. त्यांची ही कृती स्त्री मुक्तीचा आवाज बुलंद करणारी होती.धर्मरक्षणासाठी औरंगजेबाच्या विरोधात बलिदान देणाऱ्या छत्रपती शंभूराजे यांचे विचार, कार्यशैली यांना व्यक्त करणारे त्यांचे वढू तुळापूर येथील स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे असेच करावे. या स्मारकाचा नियोजित आराखडा केल्याबद्दल डॉ. पाटणकर यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले.छत्रपती संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज यांची कामगिरी गौरवास्पद आहे. सतत ४२ वर्षे मराठा साम्राज्याची पताका भारतभर फडकावणाऱ्या शाहू महाराजांचे स्मारक शनिवारवाडा पुणे व सातारा येथे व्हावे, याशिवाय शाहू महाराजांच्या राजकीय कारभाराचे आणि कार्यशैलीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणारे संशोधन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी डॉ. भारत पाटणकर यांनी केली. छत्रपती शाहू आणि स्वराज्य रक्षक सम्राज्ञी ताराराणी यांच्या माहुली येथील समाधी विपन्नावस्थेत असल्याबद्दल पाटणकर यांनी खंत व्यक्त केली. या ऐतिहासिक स्मारक आणि संशोधन केंद्राचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आम्ही देणार आहोत असे पाटणकर यांनी स्पष्ट करत मागणी दुर्लक्षित झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला .

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती