शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्यासाठी ३७१ कलमात बदल करा

By admin | Updated: August 7, 2014 00:15 IST

वाठार स्टेशन : रामराजे यांचा मोदी यांना उपरोधिक सल्ला

वाठार स्टेशन : ‘देशात ३७० घटनेनुसार समान नागरी कायदा राबवण्यापूर्वी ३७१ मध्ये बदल करण्यासाठी पुढाकार घ्या. त्याबाबतचे अधिकार गव्हर्नरना द्या, तरच पश्चिम महाराष्ट्रातील वंचित पाणी योजना पूर्ण होतील, याची माहिती नसेल तर मी देतो,’ असा उपरोधिक सल्ला महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी वाठार स्टेशन येथील कार्यक्रमात दिला.वाठार स्टेशन विकास सेवा सोसायटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते. यावेळी फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र कदम, बाळासाहेब सोळस्कर, जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, सतीश धुमाळ, पंचायत समिती सदस्या रूपाली जाधव, नागेश जाधव, छत्रपती संभाजी पतसंस्थेचे रामभाऊ लेंभे, वीरसेन पवार, अजय कदम, लालासाहेब शिंदे, बबनराव भोसले उपस्थित होते. रामराजे निंबाळकर म्हणाले, ‘वसना-वांगनाची लढाई ही आता तालुक्याची राहिली नाही. त्यासाठी एक राजकीय शक्ती उभारावी लागणार आहे. या योजनांबाबत ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांच्यात या योजना पूर्ण करण्याची धमक आहे, अशाच लोकांच्या पाठीशी उभे राहण्याचे सामर्थ्य ठेवा. उगाच ज्या पक्षांनी सर्वसामान्यांना फाशी घ्यायची वेळ आणली, अशा प्रवृत्तीमागे जाऊ नका. वसनेतून जी गावे वंचित राहिली, त्यासाठी पाण्याची तरतूद करावी लागेल, यासाठी सोळशी धरणाबाबत आग्रही राहा.’जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील म्हणाले, ‘सहकारी संस्थेत सचिव हाच त्या संस्थेचा मुख्य गाभा असतो. ज्या संस्था मोठ्या होतात त्यांचा पाया मजबूत असतो, त्यामुळेच जिल्ह्यातील सहकारात नेत्रदीपक काम जिल्हा बँक करू शकली.’ नागेश जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उत्कृष्ठ काम करणारे सचिव बबन भोसले यांचा रामराजेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)