शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

चणे-फुटाणे विकणारा बनला ‘फोन अटेन्डंट’

By admin | Updated: June 13, 2014 02:03 IST

प्रवाशांची गैरसोय : औंध बसस्थानकात चौकशी अधिकारी ‘वॉन्टेड’

कऱ्हाड : प्रवाशांच्या सेवेसाठी प्रत्येक बसस्थानकात चौकशी कक्ष कार्यरत असतो. या कक्षामध्ये नेमणुकीस असलेल्या अधिकाऱ्याने प्रवाशांना एसटीबाबत आवश्यक माहिती देणे गरजेचे असते; पण औंध बसस्थानकातील चौकशी कक्षात नेमणुकीस असणारा अधिकारीच ‘वॉन्टेड’ आहे. मंगळवारी दुपारपासून हा कक्ष रिकामा पडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तसेच बसस्थानकात चणे-फुटाणे विकणारा व्यावसायिक या कक्षातील फोन अटेन्ड करीत असल्याने प्रवाशांना अक्षरश: कपाळावर हात मारावा लागला. औंध हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी दररोज परिसरातील ग्रामस्थ कामानिमित्त येत असतात. तसेच औंधमध्ये यमाईदेवीच्या दर्शनासाठीही इतर जिल्ह्यांतील व परराज्यांतील भाविकांची गर्दी असते. शाळा, महाविद्यालयाला जाणारे हजारो विद्यार्थी दररोज औंधमध्ये येतात. येथील वस्तुसंग्रहालयाला अनेक पर्यटक भेट देतात. दररोज हजारो नागरिकांची ये-जा असल्यामुळे औंध नेहमीच गजबजलेले असते. मात्र, ज्या प्रमाणात येथे नागरिकांची वर्दळ असते त्या प्रमाणात बसस्थानकातून सुविधा पुरविल्या जात नाहीत. या ना त्या कारणाने येथील बसस्थानक नेहमीच चर्चेत असते. मंगळवारीही येथे प्रवाशांना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका सहन करावा लागला. बसस्थानकात प्रवाशांना एसटीविषयी माहिती देण्यासाठी चौकशी कक्ष आहे. मात्र, या कक्षात अपवादानेच अधिकारी पाहावयास मिळतो, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. मंगळवारी दुपारपासून कक्षात चौकशी अधिकारी उपस्थित नव्हते. कक्षाला बाहेरून कडी घालण्यात आली होती. त्यामुळे चौकशीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना कसलीही माहिती उपलब्ध होत नव्हती. अशातच कक्षातील दूरध्वनी वाजल्यास चणे-फुटाणे विकणारा व्यावसायिक कक्षाची कडी काढून आत जायचा. फोन ‘अटेन्ड’ करून साहेब बाहेर गेल्याचे सांगायचा. त्यानंतर बाहेर येऊन कक्षाला पुन्हा कडी घालून तो आपल्या कामासाठी निघून जायचा. हा सर्व प्रकार सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता. मात्र, चौकशी अधिकारी कक्षाकडे फिरकलेसुद्धा नाहीत, असे प्रवाशांनी सांगितले. काही प्रवाशांनी फोन ‘अटेन्ड’ करणाऱ्या चणे-फुटाणे विक्रेत्याकडे चौकशी केली, त्यावेळी ‘साहेब कुठे गेलेत, मला माहिती नाही,’ असे सांगून त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रवाशांबरोबरच बाहेरील आगाराच्या लांब पल्ल्याच्या एसटी घेऊन येणाऱ्या चालक, वाहकांनाही चौकशी अधिकारी नसल्याने ताटकळत थांबावे लागले. बराच वेळ वाट पाहूनही ते न आल्याने चालक, वाहकांनी एसटी बस मार्गस्थ केल्या. (प्रतिनिधी)