शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

‘चुलीवरच्या भाकरी’नं दिला ४ हजार महिलांना रोजगार !

By admin | Updated: September 23, 2016 00:41 IST

खवय्येगिरांना संधी : अस्सल गावरान खरडा-भाकरी जेवणाचा फर्डाऽऽ बेत रंगतोय ढाब्यांवर

सातारा : ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ असं म्हणत पूर्वीच्या काळी मंडळी पंजाबी डिशेसची चव चाखायला हॉटेलात जायची. काळ बदलला. टेस्ट बदलली. आता पुन्हा एकदा घरच्या चुलीवरच्या भाकरीची क्रेझ सुरू झालीय. अस्सल गावरान खरडा-भाकरी जेवणाचा फर्डाऽऽ बेत गावोगावच्या ढाब्यांवर रंगू लागलाय. यामुळं ‘तंदूर रोटी’ला किती फटका बसला माहीत नाही; परंतु हजारो महिलांच्या हातांना मात्र कायमस्वरूपी काम मिळालंय. होय. केवळ सातारा जिल्ह्यातच एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार हजार माता-भगिनींना या खरपूस भाकरीमुळं भरघोस रोजगार मिळालाय.आज पावेतो ‘भाकरीचा चंद्र’ साहित्यात चमकला. ‘आधी हाताला चटके देणारी भाकर’ही बहिणाबार्इंच्या कवितेतून प्रकटली. ‘चतकोर भाकरी’चं उद्र्रेकी काव्यही उपाशी पोटी जन्माला आलं. ‘न फिरवल्यामुळे भाकरी कशी करपते,’ हे बारामतीकरांच्या भाषणातून सत्ता बदलापूर्वी राजकीय तज्ज्ञांना अनेकवेळा समजलं; परंतु प्रत्यक्ष जीवनातून मात्र ही भाकरी हद्दपार होत गेली. ‘इंस्टंट पोळी’च्या युगात ‘पिठाची बडवा-बडवी’ पुरती कालबा’ झाली. अशातच मराठी खवय्याला ‘पंजाबी डिशेस’ अन् ‘गुजराथी थाळी’ची ओढ लागली. गेल्या दोन-तीन दशकांत ‘नॉर्थ अन् साऊथ इंडियन टेस्ट’नं हॉटेलच्या काउंटरवर अधिराज्य केलं.मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही टेस्ट पुन्हा झपाट्यानं बदलत गेलीय. ‘भाकरी कशाशी खातात,’ हे माहीत नसणारी नवीन पिढी अस्सल गावरान जेवण अनुभवण्यासाठी आसुसलीय, हे ओळखून गावोगावच्या ढाब्यांवर ‘तंदूर भट्टी’ नजीकच चूल मोठ्या कौतुकानं बांधली गेलीय. सातारा जिल्हा तर पर्यटनाचा बालेकिल्ला. महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, तापोळा, कास पठार अन् कोयना धरणासह असंख्य पर्यटनस्थळं हजारो पर्यटकांनी गजबजून गेलेली. या पट्ट्यात वळणावळणावर ढाबे अन् हॉटेल्सची संख्या चिक्कार. खवय्यांची गर्दीही तुडुंब.‘पुणे-बेंगलोर हायवे’वर तर जागोजागी हॉटेल्सच्या फलकांची जाहिरातबाजी; पण यातल्या बहुसंख्य होर्डिंग्जवर एखाद्या हिरोईनच्या थाटात एका आज्जीबाईचा भलामोठ्ठा फोटो. ‘कॅतरीनाचा कैफ’ही कमी पडावा... ‘करिनाची क्रेझ’ही कमी वाटावी, अशा पोझमध्ये फ्लेक्सवर झळकणारी ही आज्जीबाई चक्क चुलीच्या धुरात भाकऱ्या थापताना दिसते. ‘फूड मॉल’च्या पब्लिसिटीसाठी इरकल साडीतल्या सर्वसामान्य खेडवळ बाईचा वापर होण्याची ही अजब घटना म्हणजे बदलत्या युगाची नांदीच! विशेष म्हणजे, अशा हजारो महिला आज-काल प्रत्यक्षात ढाबा-ढाब्यांवर भाकरी थापताना दिसताहेत. वाईतील एका ढाब्यावरच्या किचनमध्ये भाकरी बडविणारी गौराबाई सांगत होती, ‘येका तासामंदी म्या तीस भाकऱ्या बडवित्ये; पण भाईरून म्हंजी मालकाच्या काउंटरवरनं मोठी आर्डर आली तर मातूर माजा स्पीड वाढतूया. येका टायमाला शंभर-शंभर भाकऱ्याबी बडवुनशान म्या दिल्याती.’ बोलताना गौराबाईचा हात सराईतपणे पिठाच्या गोळ्यावरून झरझर फिरत होता. एकाच वेळी एकीकडं भाकरी थापणं तर दुसरीकडं तव्यावर भाजणं, असा ‘टू इन वन’ प्रोग्राम व्यवस्थितपणे सुरू होता.साताऱ्यातील हॉटेलचालक तुषांत माने यांनी दिलेली माहिती तर आश्चर्यकारकच होती, ‘पूर्वी दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर उन्हा-तान्हात मजुरी करणाऱ्या महिलांना आता या भाकरीमुळं बसल्याजागी चांगलाच रोजगार मिळालाय. महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपयांचा पगार मिळतोय. पुन्हा वर हक्काची साप्ताहिक सुटी.’ (प्रतिनिधी)खरपूस वास नाकात शिरल्यावर..... तर अशी ही भाकरी. कुणाला बाजरीची आवडते तर कुणाला नाचणीची. तरीही खरी भाकरी ही ज्वारीचीच. भाकरी खरंतर गॅसवरही तयार होऊ शकणारी; परंतु धगधगत्या चुलीवरच्या गरमागरम तव्यावर भाजली जाणारी भाकरी काही औरच. तिचा खरपूस वास नाकात शिरल्यानंतरही भूक नाही लागली तर आई शपथ. भाकरी थापण्याचंही एक खास तंत्र असतं. चारही बाजूनं बड-बडवून गोलाकार बनल्यानंतर भाकरी तव्यावर पडते, तेव्हा त्याला नेमकं पाणी लावण्याचंही ‘टायमिंग’ जमायला हवं. भाकरी जेवढी पातळ होईल, तेवढी टम्म फुगण्याचे चान्सेस अधिक त्यात पुन्हा ती सतत फिरवायलाही हवी, नाही तर करपलीच समजा. मात्र अनेकांना ही करपलेली भाकरीही खूप आवडते बरं का. तर मग मंडळी.. कधी निघणार बाहेर? अस्सल चुलीवरची खरडा-भाकरी खायला?भाकऱ्या थांपण्याचं स्कील मॅनेजमेंटपूर्वी ‘पंजाबी डिश’ संस्कृतीत ‘वस्ताद’ या पुरुषी व्यक्तिमत्त्वावरच हॉटेलिंगचा व्यवसाय अवलंबून असायचा; परंतु चुलीवरच्या भाकरीचं ‘धूम्र युग’ परत अवतरल्यानंतर आतल्या भट्ट्यांवर आता ताई-माई-आक्का यांची पुन्हा वर्दळ वाढलीय. सातारा जिल्ह्यातील किमान दीड हजार हॉटेल्समध्ये आज भाकऱ्या भाजणाऱ्या महिलांना रोजचा रोजगार मिळालाय. या महिलांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर चार हजारांच्या आसपास पोहोचलीय. यातल्या बहुतांश अशिक्षित अन्वयस्कर, तरीही भाकऱ्या थापण्याच्या ‘स्कील मॅनेजमेंट’मध्ये माहीर.