शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
3
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
4
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
5
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
6
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
7
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
8
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
9
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
10
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
11
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
12
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
13
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
14
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
15
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
16
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
17
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
18
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
19
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
20
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

केंद्रीय पथकाकडून मिरजेत सोनोग्राफी केंद्रास टाळे

By admin | Updated: May 17, 2017 21:21 IST

आरोग्य विभागाच्या केंद्रीय पथकाने मिरजेत मंगळवारी डॉ. सोमशेखर पाटील यांच्या सोनोग्राफी केंद्राची तपासणी करून केंद्राला टाळे ठोकले

मिरज : आरोग्य विभागाच्या केंद्रीय पथकाने मिरजेत मंगळवारी डॉ. सोमशेखर पाटील यांच्या सोनोग्राफी केंद्राची तपासणी करून केंद्राला टाळे ठोकले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता व म्हैसाळ भ्रूणहत्याकांड प्रकरणातील चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यासोबत बैठक घेऊन पथकाने डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या चौकशीबाबत माहिती घेतली. पंचायत समितीत आशा वर्कर्स व मदतनीसांची बैठक घेऊन भ्रूणहत्येचे प्रकार रोखण्याबाबत सूचना दिल्या.म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांड प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाचे केंद्रीय पथक सांगलीत आले आहे. त्यात डॉ. सुषमा दुरेजा, डॉ. वीणा धवन, डॉ. जिग्नेश ठक्कर, डॉ. वर्षा देशपांडे यांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी या पथकाने म्हैसाळला भेट दिल्यानंतर डॉ. सापळे यांच्याशी चर्चा केली. आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या समितीने डॉ. खिद्रापुरे याच्या कृत्याची चौकशी पूर्ण केली असून, याबाबत सोमवारी आरोग्य संचालकांकडे अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागात खिद्रापुरे याने हत्या केलेल्या स्त्री भ्रूणांची व न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील सुविधांची केंद्रीय पथकाने पाहणी केली. बैठकीनंतर पथकाने मिरजेतील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सोमशेखर पाटील यांच्या रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रातील रेकॉर्ड व कागदपत्रांची तपासणी केली. तेथील रेकॉर्डमध्ये अनियमितता आढळली. सोनोग्राफी रजिस्टरमध्ये रुग्णांच्या सह्या नसल्याने रजिस्टरसह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. पथकाने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी व डॉ. राजेंद्र कवठेकर यांना पाचारण करून सोनोग्राफी केंद्रास टाळे ठोकले. तेथील रेकॉर्डची छाननी करण्याच्या सूचना पथकाने महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. या सोनोग्राफी केंद्रास यापूर्वीही एकदा टाळे ठोकण्यात आले होते.केंद्रीय पथकातील चारपैकी दोघींनी वेगवेगळ्या ठिकाणी अचानक भेटी दिल्या. यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. पंचायत समितीत आशा वर्कर्स, आरोग्य सेविका, मदतनीसांची बैठक घेऊन स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार रोखण्यासाठी सतर्क रहावे. असे प्रकार कोठे सुरू असल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहनही या पथकाने केले. गावातील गर्भवती महिला अचानक दिसेनाशी झाल्यास तिची चौकशी करून माहिती घेण्याची सूचना देण्यात आली. बैठकीस सुमारे १८३ महिला उपस्थित होत्या. बंद सभागृहात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना बाहेर काढून पथकाने महिलांशी संवाद साधला.सिव्हिलच्या डॉक्टरांमुळेच प्रकरण उघडकीस!अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगली शासकीय रुग्णालयामधील (सिव्हिल) डॉक्टरांमुळेच खिद्रापुरे प्रकरण उघडकीस आल्याचा दावा केला. अवैध गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या पीडित महिलेचा मृत्यू अशक्तपणामुळे झाल्याचे भासविण्यात येत होते. मात्र सिव्हिलमधील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी शवविच्छेदनाचा निर्णय घेतल्याने गर्भपात प्रकरण उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.रुग्णांकडेही विचारपूसकेंद्रीय पथकाने डॉ. सोमशेखर पाटील यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या काही महिला रुग्णांची विचारपूस केली. गर्भवती महिलांना यापूर्वी मुली किती आहेत, याचीही माहिती घेतली. अगोदर मुली असल्याने आता मुली नको असल्याचे काही रुग्णांनी सांगितल्याने सोनोग्राफी केंद्रातील रेकॉर्डची कसून तपासणी करण्यात आली.