सातारा : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, निर्माण बहुद्देशीय विकास संस्था आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री कोटेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, गोवे येथे बालिका दिन व मतदार दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, प्रा. जीवन बोराटे, शिवाजी राऊत, काजल गायकवाड यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. याप्रसंगी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून बालिका व महिलांना कोणत्या प्रकारचे लाभ मिळतात याविषयी सविस्तर माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी मतदार दिनाचे महत्त्व, तर शिवाजी राऊत यांनी बालिका दिनाचे महत्त्व सांगितले.