शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मसूरमध्ये सीसीटीव्ही बनलेत शोपीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:06 IST

masur, cctv, karad, sataranews मसूर येथील मुख्य चौकातील सीसीटीव्ही गत अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देमसूरमध्ये सीसीटीव्ही बनलेत शोपीसकेवळ खांबावर भार : दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष

मसूर : येथील मुख्य चौकातील सीसीटीव्ही गत अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.मसूर ही परिसरातील सुमार ४० गावांची मुख्य बाजारपेठ आहे. दररोज येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. परिसरातील हजारो लोकांची विविध कामासाठी येथे ये-जा सुरू असते. त्यातच सध्या दिवाळी सणासाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सजवली आहेत. विक्रीसाठी मालही मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे चालू असल्यास त्यांना भीती वाटत नाही. परंतु हे कॅमेरे बंद असल्याने व्यापारी भीतीच्या छायेत आहेत.

या चौकातून पाटण-पंढरपूर मार्ग, कऱ्हाड-मसूर मार्ग, कऱ्हाड-किवळ असे मार्ग जात असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ असते. सीसीटीव्हीमुळे सर्व ठिकाणाहून येणाऱ्या वाहनांवर लक्ष राहत होते. मात्र, सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे व्यापारी, ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान, गत चार दिवसांपूर्वी अंतवडी गावच्या शिवारात काही संशयास्पदरीत्या फिरत होते. ग्रामस्थांच्या सतर्कतेने संबंधितांना हकलण्यात आले आहे. विभागात काही दिवसात चोरीच्या घटना घडल्या नसल्या तरी यापूर्वी मुख्य चौकाच्या परिसरातील दुकानेच चोरट्यांनी टार्गेट केली होती. त्यामुळे येथे सीसीटीव्ही असणे अत्यंत आवश्यक आहे. या चौकातून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. तसेच किरकोळ वादावादीच्या घटना ही या चौकात घडत असतात. तसेच वाहन चोरीच्या घटनाही काहीवेळा घडल्या आहेत. मात्र सीसीटीव्हीमुळे काही घटनांची उकल झाली होती. संबंधित विभागाने येथील सीसीटीव्ही सुरू करून सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांनी केली आहे.चाळीस गावांतील ग्रामस्थांची गर्दीमुख्य चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबत वारंवार तक्रार करूनही हे कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून चालू केलेले नाहीत. सध्या दिवाळीमुळे खरेदीसाठी परिसरातील सुमारे चाळीस गावांतील ग्रामस्थांची गर्दी मसूर चौकात दिसून येते. त्यावरही सीसीटीव्हीचा ह्यवॉचह्ण असणे आवश्यक आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीSatara areaसातारा परिसर