शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

भ्रष्टाचाराची प्रकरणे काढणार निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:23 IST

सातारा : ‘जिल्ह्यात १११ भ्रष्टाचाराची प्रकरणे आढळून आली आहेत. ही प्रकरणे तीन महिन्यांत निकाली लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भ्रष्टाचाऱ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे,’ अशी माहिती सातारा दौºयावर आलेल्या पंचायती राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात गुरुवारी पंचायती राज समितीने जिल्हा परिषदेच्या कारभाराचे ...

सातारा : ‘जिल्ह्यात १११ भ्रष्टाचाराची प्रकरणे आढळून आली आहेत. ही प्रकरणे तीन महिन्यांत निकाली लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भ्रष्टाचाऱ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे,’ अशी माहिती सातारा दौºयावर आलेल्या पंचायती राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात गुरुवारी पंचायती राज समितीने जिल्हा परिषदेच्या कारभाराचे २०१३-१४ च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची साक्ष नोंदवली.यानंतर आमदार पारवे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी आमदार दिलीप सोपल, आमदार दीपक चव्हाण, आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार चरण वाघमारे, आमदार रणधीर सावरकर, आमदार अ‍ॅड. राहुल कुल, आर. टी. देशमुख, आमदार देवराज होळी, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधाकर भालेराव, आमदार सुधाकर कोहळे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार किशोर पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, तुकाराम काते, आमदार राहुल बोंद्रे, आमदार भारत भालके, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार राहुल मोटे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार डॉ. तानाजी सावंत, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बाळाराम पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह इतर अधिकारी व सदस्य उपस्थित होते.अफरातफरीच्या प्रकरणांतील महसूल शासनाकडे जमा झाला पाहिजे. भ्रष्टाचाराची प्रकरणे आता प्रलंबित राहणार नाहीत, तीन महिन्यांत ही प्रकरणे निकाली काढली जातील.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामही उल्लेखनीय असेच आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी डिजिटल शाळांसाठी संकल्प सोडला आहे. अनेक ठिकाणी वर्ग खोल्या गावांनी बांधून दिल्या आहेत. लोकसहभागातून शिक्षणाच्या संदर्भाने क्रांती करण्याचे काम जिल्ह्याने केले. मंदिर बांधण्यासाठी निधी गोळा करण्यापेक्षा शाळांचे वर्ग खोल्या बांधण्यासाठी निधी द्यावा, या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सर्वच आलबेल आहे, असे आम्ही म्हणणार नाही; पण सकारात्मक दृष्टिकोनातून सुरू असलेले काम पाहून आम्हाला समाधान वाटले आहे,’ असे आमदार पारवे म्हणाले.दरम्यान, जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे संख्या कमी आहे, याबाबत शासन काही निर्णय घेणार आहे का? या प्रश्नावर एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता असून त्याऐवजी इतर बीएएमएस, बीएचएमएसचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची भरती करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहेत.जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात प्रभावी कामजिल्ह्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे काम अत्यंत प्रभावीरीत्या सुरू आहे. प्रशासन सकारात्मक दृष्टिकोनातून काम करत असल्याने लोकसहभागही मोठा मिळत आहे, असे गौरवोदगार पंचायती राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी काढले.कामचुकार अधिकाºयांची पडताळणीज्या अधिकाºयांनी कामचुकारपणा केला आहे. त्यांची साक्ष लावून पडताळणी करण्यात येणार असल्याचा इशारा आमदार पारवे यांनी दिला असल्याने जिल्हा परिषदेत कामचुकार अधिकारी कोण? याबाबत चर्चा रंगली होती.