शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वायरिंगमुळं पेटतायत गाड्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:18 IST

सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदार आहे. वेळच्या वेळी वाहनांची काळजी न घेतल्याने दुर्घटना घडत आहेत.बदलत्या जीवनशैलीमुळं घरटी वाहनांची संख्या वाढत ...

सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदार आहे. वेळच्या वेळी वाहनांची काळजी न घेतल्याने दुर्घटना घडत आहेत.बदलत्या जीवनशैलीमुळं घरटी वाहनांची संख्या वाढत आहे. घरात जेवढी माणसं तेवढीच दुचाकी वाहनं अन् एखादी कार येत आहे. आधुनिक काळात ही काळाची गरजही आहे; पण प्रत्येकजण नोकरी व्यावसायात गुंतून गेला असल्याने त्याला वाहनांची देखभाल करायला वेळच मिळत नाही. त्यातून तो एक-एक दिवस पुढे ढकलतो अन् अपघातांना सामोरे जावे लागते.सातारा जिल्ह्यासाठी वाहनांनी पेट घेणे नवीन नाही. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गाड्यांनी पेट घेण्याच्या घटना वारंवार घडतात. खंबाटकी घाट, पसरणी घाटातही यापूर्वी अनेकदा वाहनांनी पेट घेतले आहेत. कारने पेट घेतल्यानंतर रस्ता अन् वाहनाचे इंजिन यांच्यातील अंतर कमी असल्याने, तसेच रस्ता तापलेला असतो अशी कारणे दिली जातात; पण या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी रस्ता तापल्याने गाडी पेटतात, हे मानायला फारसे तयार नाही.फलटण शहरात गेल्या महिन्यात विद्यार्थी वाहतूक करणाºया बसनेही पेट घेतला होता. गाडीतून येत असलेला धूर चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्याने तातडीने मुलांना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यानंतर पूर्ण वाहन जळून खाक झाले. चालकाच्या वेळीच निदर्शना आले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.अत्याधुनिक सुविधा; पण धोकाही तेवढाचवाहनांच्या तंत्रज्ञानात कमालीचा बदल होत आहे. वाहनांचा वेग वाढावा, प्रदूषण कमीत कमी व्हावे म्हणून नवीन वाहनांमध्ये आधुनिक सुविधा पुरवल्या जातात. टर्बो चार्जर आले आहेत. सरासरी ८० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्ण हवा घेतली जाते. त्याचवेळी गळती लागल्याने पेट घेण्याच्या घटना घडतात.नियमित देखभाल हाच पर्यायप्रवासी वाहतूक करणारे वाहन असो व मालवाहू. प्रत्येकाची नियमित काळजी, देखभाल करणे हाच एकमेव पर्याय आहे. यामध्ये डिझेल, आॅईलची गळती रोखणे, वायरिंगला कोटिंग करणे, शक्य असल्यास त्यावर पुन्हा पॅकिंग केल्यास वायरमुळे अपघात घडण्याचे प्रमाण कमी होईल.