शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गाड्या सांभाळा; रात्रीस खेळ चाले

By admin | Updated: January 2, 2017 23:13 IST

चिमणपुरातील दुचाकी जळीत घटना : कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन अज्ञातांनी साधला डाव

सातारा : गाड्या जाळण्याचे प्रकार पूर्वी पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरांमध्ये घडत होते. हे प्रकार आता सातारा शहरातही घडू लागल्याने परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ‘गाड्या सांभाळा, रात्रीस खेळ चाले,’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.सरत्या वर्षाला निरोप देऊन पुढील वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, अशा शुभेच्छा देत गोसावी कुटुंब रविवारी मध्यरात्री साखरझोपेत असतानाच फटाके वाजल्याचा मोठा आवाज आला. आवाज ऐकून घरातील ज्येष्ठ मंडळी बाहेर येऊन पाहताच दुचाकींना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड करून इतरांना जागे करून होणारा अनर्थ टाळला. सातारा शहरातील चिमणपुरा पेठेत अज्ञातांनी घरासमोर लावलेल्या चार दुचाकी जाळल्या. या घटनेने पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने गोसावी कुटुंबीयांनी अख्खी रात्र जागून काढली. येथील चिमणपुरा पेठेत गोसावी यांचे तीन कुटुंब आणि भाडेकरूंचे तीन अशी सहा कुटुंबे राहतात. महेंद्र गोसावी यांनी आपली दुचाकी व इतर दोन दुचाकी घराबाहेर लावल्या होत्या तर एक दुचाकी घराच्या जिन्याखाली लावली होती. अज्ञातांनी अगोदर महेंद्र यांच्या दोन्ही दुचाकींना आग लावल्याने त्यांच्याच गाडीच्या शेजारी असणाऱ्या दोन गाड्यांना झळ बसल्याने त्याही जळाल्या. जाळलेल्या चार दुचाकीपैकी केवळ एका गाडीचा विमा असून, तीन गाड्यांचा विमा उतरविले नसल्याचे महेंद्र गोसावी यांनी सांगितले.दरम्यान, रविवारी रात्री एकच्या सुमारास घराजवळ कुत्रे जास्त भुंकत असल्याने बाहेर येऊन पाहणी केली असता, कोणतीही हालचाल निदर्शनास न आल्याने पुन्हा झोपी गेले. हीच संधी साधून अज्ञातांनी आपला डाव साधला. यापूर्वी त्यांनी कुत्रे जास्तच भुंकत असल्याने कुत्र्यांचाही बंदोबस्त केला. रात्री एकच्या सुमारास दोन्ही कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध केले. नंतर कुत्रे झोपी गेल्याने दीडच्या सुमारास चारही दुचाकी जाळल्या गेल्या. (प्रतिनिधी)घटनेला राजकीय किनार?चिमणपुरामधील घडलेल्या घटनेला अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ही घटना दोन राजकीय कलहातून घडली असल्याची चर्चा सध्या परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडली होती. त्या घटनेशी काहीजण संबंध जोडत आहेत. गोसावी कुटुंबीयांची कोणाची, कोणाशी शत्रुत्वही नाही, तर अशा घटना वारंवार घडत असल्याने चिमणपुरा पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी दोन नेत्यांमधील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून ही घटना घडली तर नसेल ना, अशी चर्चा सध्या पेठेत पाहायला मिळत आहे.