शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

फूटपाथवरच्या गर्दीत भरधाव कार घुसली!

By admin | Updated: August 4, 2015 23:18 IST

हिट अँड ‘फन’ : भर मोती चौकात तिघांना जखमी करणाऱ्या अपघाताचा पाऊण तास ‘इव्हेन्ट’

सातारा : मोती चौक. साताऱ्याच्या गळ्यातला मोती. गजबजलेली दुपार. दुकानांत आणि फूटपाथवरही विक्रेते, ग्राहक नेहमीच्या बिनधास्त, निवांत मूडमध्ये. अशा वेळी एक कार भरधाव वेगात रस्ता सोडून थेट फूटपाथवर चढते आणि हलकल्लोळ उडतो. जखमी झालेल्या तिघांची पाठवणी रुग्णालयात झाल्यानंतर मात्र पाऊण तासाचा ‘इव्हेन्ट’ रंगतो...‘साताऱ्याचा सलमान’ (ही उपस्थितांनीच दिलेली उपाधी बरं!) अजून गाडीतच बसून राहिलेला. दार उघडून बाहेर येण्याची हिंमत कुठे होतेय? गाडीभोवती गर्दी जमलीय. कुणी भेदरलेल्या जखमींना हात देतोय तर कुणी गाडीत डोकावून पाहतोय. फूटपाथजवळ असलेल्या फळविक्रेत्या वृद्धाला धक्का देऊन गाडी फूटपाथवर चढली. तिथं आणखी दोन महिलांना धक्का दिला. तिघांच्याही जखमा फारशा गंभीर नसल्या, तरी अचानक समोर आलेली गाडी बघून हृदय बंद पडायचंच बाकी राहिलेलं! ‘हो... हो’ म्हणेपर्यंत धक्का!चुन्याची पाटी आणि पोपटी रंगाच्या लहानमोठ्या डब्या विकायला नेहमी त्याच ठिकाणी बसणारी महिला तर धक्क्यानंतरही तशीच बसून राहिलेली. तिच्यापासून केवळ एका फुटावर गाडी थांबली होती, नाहीतर..! तिला ओरडता येईना. तोंडून शब्द फुटेना, अशी अवस्था. जखमींना फारसा मार लागलेला नाही, हे लक्षात आल्यावर तिघांना रिक्षातून रुग्णालयात पाठवलं गेलं आणि मग या विचित्र अपघाताच्या कारणांचा शोध सुरू झाला. गाडी कुठून आली, फूटपाथवर कशी चढली, ड्रायव्हर नवीन आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या. पोलिसांना निरोप गेला. ड्रायव्हर मात्र अजून गाडीतच!ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा वेगवेगळ्या गावांमध्ये रवाना झाल्यामुळं चौकात पोलीस यायला बराच वेळ लागला. तोपर्यंत चौकात अपघाताचा ‘इव्हेन्ट’ होत गेला. दुकानाच्या फळीला जाऊन टेकलेल्या गाडीखाली आणखी कुणी (किंवा आणखी काही) आहे का, हे काही जणांनी तपासून पाहिलं. मग मात्र अँड्रॉइड फोन बाहेर आले. वेगवेगळ्या अँगलमधून अपघातग्रस्त गाडीचा ‘फोटोसेशन’ सुरू झाला. बघ्यांच्या गर्दीतून मोबाइल कॅमेऱ्यांचे ‘ची-ची’ आवाज येऊ लागले. ‘अपघात’ या गोष्टीविषयी लहान मुलांना असलेलं कुतूहल शमवण्याचा प्रयत्नही काही पित्यांनी केला. लहानग्यांनीही अपघातग्रस्त गाडी ‘जवळून’ पाहून घेतली.सुमारे अर्ध्या तासानं पोलिसांच्या उपस्थितीत ड्रायव्हर गाडीबाहेर आला. भालचंद्र केशव मुळे (रा. समर्थ मंदिर, सातारा) असं त्याचं नाव असल्याचं समजलं. पण गाडी त्याची नव्हतीच. गाडीमालकाचं नाव मोहन हणमंते असल्याचा साक्षात्कारही उपस्थितांना झाला. त्याचप्रमाणं तीन जखमींपैकी एकीचं नाव भाग्यश्री पांडुरंग कोकरे असं आहे, याचाही उलगडा झाला. पोलिसांनी मग चालकाला घटनास्थळावरून पोलीस ठाण्यात नेलं आणि क्रेन बोलावून गाडी फूटपाथवरून हलवली. मोती चौक हा साताऱ्याचा केंद्रबिंदू मानला जातो. या चौकात नेहमी वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची गर्दी असते. फूटपाथवर अनेक विक्रेते वर्षांनुवर्षे व्यवसाय करीत आहेत. पानवाले, चुनावाले आणि अधून-मधून येणारे भाजी व फळविक्रेते मोती चौकातच असतात. अशा ठिकाणी घडलेला हा अपघात नुकसानकारक ठरला नसला तरी धक्कादायक मात्र ठरला.(प्रतिनिधी)दूरदूरचे ‘प्रेक्षक’ हजर!सातारा कितीही विस्तारला तरी मोती चौकाचं महत्त्व अढळ राहिलंय. अशा चौकात चक्क गाडी फूटपाथवर चढली, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोवई नाक्यावरूनही काही जणांनी मोती चौकाकडे धाव घेतली. आजूबाजूच्या गल्ली-बोळांमधून तर ‘प्रेक्षक’ आलेच; पण दूरदूरचे बघेही पोलिसांच्या आधी चौकात हजर!