शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधी करून परतताना कारला अपघात, दोन जणांचा मृत्यू; चार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 09:44 IST

डिस्कळ येथील नातेवाइकाच्या अंत्यविधीवरुन परत येताना कार ओढ्याच्या संरक्षक कठड्याला धडकली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून चौघेजण जखमी झाले.

तरडगाव /लोणंद (सातारा) : डिस्कळ येथील नातेवाइकाच्या अंत्यविधीवरुन परत येताना कार ओढ्याच्या संरक्षक कठड्याला धडकली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून चौघेजण जखमी झाले. हा अपघात फलटण रस्त्यावर तरडगाव हद्दीतील पालखी तळाजवळ भोवर ओढ्याच्या पुलावर पहाटे दोनच्या सुमारास झाला. मृत पाडेगाव व जेऊर येथील आहेत. जखमीना लोणंद येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

चालक संजय शिवाजी धुमाळ (वय ४३,  रा. मांडकी ता. पुरंदर) व शोभा नंदकुमार धुमाळ (४५, रा. पाडेगाव ता. फलटण) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, पाडेगाव व जेऊर येथील धुमाळ कुटुंबीय नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी कार (एएम १२ एच झेड ७७२७) ने बुध, डिस्कळ येथे गेले होते. ते मध्यरात्री गावी परतत असताना त्यांची गाडी लोणंद-फलटण रस्त्यावर तरडगाव गावच्या हद्दीत पालखी तळाजवळील आली असता कठड्याला धडकली. यामध्ये चालक संजय धुमाळ व शोभा धुमाळ हे ठार झाले. तर सारिका संजय धुमाळ, कमल दगडू धुमाळ व अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांचावर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.