शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांवर उमेदवारांची गणितं  : निवडणुकीचे रण पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 11:57 IST

सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे रण पेटले असूून, माढ्यात काटे की टक्कर तर साताºयात चुरस निर्माण झाली आहे. यामुळे ज्या-त्या विधानसभा मतदार संघातील आमदारांवरच सर्वच उमेदवारांची बेरीज-वजाबाकी ठरणार आहे.

ठळक मुद्देसाताºयात उदयनराजेंबरोबर पक्षाचे आमदार; माढ्यात गोरेंच्या भूमिकेकडे लक्ष 

- नितीन काळेल । 

सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे रण पेटले असूून, माढ्यात काटे की टक्कर तर साताºयात चुरस निर्माण झाली आहे. यामुळे ज्या-त्या विधानसभा मतदार संघातील आमदारांवरच सर्वच उमेदवारांची बेरीज-वजाबाकी ठरणार आहे. साताºयात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे यांच्याबरोबर पक्ष व आघाडीचे आमदार दिसत असून, माढ्यात मात्र माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या भूमिकेवर सर्व चित्र अवलंबून आहे. 

२००९ च्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनुसार साताºयातील माण-खटाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघ माढ्याला जोडण्यात आला. सातारा लोकसभेसाठी सातारा-जावळी, वाई-महाबळेश्वर-खंडाळा, कºहाड दक्षिण, कºहाड उत्तर, पाटण आणि कोरेगाव असे विधानसभेचे मतदारसंघ आहेत. सातारा, वाई, कºहाड उत्तर आणि कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार तर पाटणला शिवसेना व कºहाड दक्षिणचे नेतृत्व काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतात. आघाडी धर्मानुसार पाच ठिकाणच्या आमदारांची ताकद राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मिळायला पाहिजे. पण, अजूनही ताकद लागल्याचे दिसत नाही.  

साताºयात उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे आता एकत्र आहेत; पण शिवेंद्रसिंहराजेंचे कार्यकर्ते सद्य:स्थितीत काठावरच आहेत. सेनापतींचा प्रचारात सहभाग वाढत असलातरी सैन्य मात्र अजून बघ्याच्या भूमिकेत आहे. तर मतदार संघात दोन्ही राजेंचे वर्चस्व आहे. जावळीत शिवेंद्रसिंहराजेंना मानणारा वर्ग अधिक आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या आदेशावरच कार्यकर्त्यांची लढाई असणार आहे. कोरेगावचे आमदार आणि उदयनराजेंचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या निवडणुकीत पहिल्यापासून ते उदयनराजेंसोबत आहेत. त्यामुळे उदयनराजेंची वाट त्यांच्याकडून सुकर आहे. वाईचे आमदार मकरंद पाटील असून, त्यांचे व उदयनराजेंचे संबंध सौहार्दपूर्णच राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून पाटील हे उदयनराजेंसाठी शक्ती पणाला लावत आहेत. 

कºहाड दक्षिणचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतात. ते आघाडी धर्म म्हणून उदयनराजेंबरोबरच आहेत. तर कºहाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे उदयनराजेंबरोबर आहेत. दोघांचे फारसे सख्य नसलेतरी पक्षाचा उमेदवार म्हणून व आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून पाटील यांना उदयनराजेंचेच काम करावे लागणार आहे.

पाटणचे आमदार शंभूराज देसाई आणि उदयनराजेंचे मैत्रीपूर्ण संबंध असलेतरी पक्षाचाच उमेदवार आता आहे. त्यातच सेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे पाटण तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा विनासंकट पार पडावी, यासाठी देसाई यांना नरेंद्र पाटलांसाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. जयकुमार गोरे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंना मदत करतो पण, माढाबाबत निर्णय झालेला नाही अशी भूमिका घेतल्याने ते काय निर्णय घेणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे.  

गोरे उदयनराजेंच्या प्रचारात...

फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे राष्ट्रवादीचे आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या बरोबरीने ते माढा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासाठीच मैदानात उतरतील. खरा प्रश्न माणचे आमदार जयकुमार गोरेंचा आहे.  माढा मतदारसंघाबाबत गोरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, सातारा लोकसभा मतदार संघात ते उदयनराजेंच्या प्रचारासाठी उतरले आहेत. राष्ट्रवादीपेक्षा उदयनराजेंशी असलेले मित्रत्वाचे नाते त्यांनी येथे समोर ठेवले आहे.  

टॅग्स :satara-pcसाताराLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक