शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कॅलिफोर्नियातील ‘सौख्या’च्या गायनाने गोंदवलेकर भारावले

By admin | Updated: December 21, 2016 23:48 IST

शास्त्रीय गायनाची मैफल : बंदीश, भावगीतांनी मिळविली दाद

दहिवडी : मूळची कोल्हापूरची आणि सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियात स्थायिक असलेल्या अवघ्या १८ वर्षांच्या सौख्या इनामदारने ब्रह्मचैतन्य महाराजांवर असलेली आपली निष्ठा शास्त्रीय गायनाच्या माध्यमातून अधोरेखित केली. तिने केलेल्या गायनाने गोंदवलेकर मंत्रमुग्ध झाले. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या उत्सवानिमित्ताने दररोज गायन, प्रवचन, भजन, कीर्तन हे कार्यक्रम होत असल्याने महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक श्रोते या ठिकाणी आले आहेत. अनेकजण महाराजांच्या प्रती आपली सेवा अर्पण करीत आहेत. सौख्या इमामदार ही सध्या कॅलिफोर्नियात स्थायिक असली तरी तिने ब्रह्मचैतन्य महाराजांवर असलेली निष्ठा गायनातून अधोरेखित केली. तिने थेट कॅलिफोर्नियातून शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर करून गोंदवलेकरांची मने जिंकली.या मैफलीत शुद्ध सारंग राग, मिया मल्हार, मिश्र निलंग बंदिशा सोबत एकताल सादर केला. ‘युवती मना’ हे संगीत मानापनामधील नाट्यगीत ‘मी राधिका मी प्रेमिका’ आणि ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ अशी कठीण भावगीते सौख्याने सादर केली. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘देस रागावर मन मंदिरा तेजाने’ या गीताने श्रोत्यांनी तिला डोक्यावर घेतले. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भावगीतांनी रंगलेली मैफल ‘कसा मला टाकूनी गेला राम, अरे अरे ज्ञाना’ या गीतांनी मैफलीत रंगत आणली.लहानपणापासून आईकडून मिळालेले धडे गिरवीत आज सौख्याने गोंदवलेतील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्रीधर फडके यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभल्याने अनेक पारितोषिके तिने जिंकली आहेत. सौख्याला मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियम, शिरीष जोशी तबला, जयंत ओक यांनी टाळ वाजवून साथ दिली. (प्रतिनिधी)आईकडून घेतले धडेस्वर सौख्याचे स्वप्न साऱ्यांचे’ ही मैफल सादर करून सौख्याने आपण कॅलिफोर्नियात असलो तरी आजही मराठी मातीवर तितकेच प्रेम करतो हे दाखवून दिले आहे. सौख्याने आई रेणुका इनामदार यांच्यासह मनोज ताम्हणकर व अर्चना ताम्हणकर यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. तीने सुरेख गाणी सादर करून गोंदवलेकरांची वाहवा मिळवली.