शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सीएए, एनआरसी कायदा रद्द करा ! क-हाडात सर्वधर्मीयांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 19:04 IST

देशाच्या ऐक्यास व अखंडतेस या कायद्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ताबडतोब सीएए व एनआरसी हे कायदे रद्द करावेत व राज्य सरकारने हे कायदे महाराष्ट्रात लागू होऊ देऊ नये, अशी मागणी यावेळी सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्दे क-हाड येथे एमआयएम, एनएसयूआय, भीम आर्मी आदी संघटनांच्यावतीने एनआरसी व सीएए कायद्याच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (छाया : अरमान मुल्ला)

क-हाड : भारतात केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन (एनआरसी) असे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहेत. संबंधित कायदे हे स्पष्टपणे धर्मावर आधारित भेदभाव करणारे आहेत. या कायद्यांमुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे देशातील सीएए, एनआरसी कायदा रद्द करावेत, अशी मागणी करीत क-हाडात सोमवारी एमआयएम, भीम आर्मी, एनएसयूआयसह सर्वधर्मीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला.

संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने एनआरसी व सीएए कायदा रद्द करण्याबाबत मागणीचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, क्राईम ब्रँचचे अशोक चौहान उपस्थित होते.यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, एनएसयूआयचे शिवराज मोरे, भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी, जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, नगरसेवक फारूक पटवेकर, अख्तर आंबेकरी, इसाक सवार, अनिल पाटील, आनंद लादे आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला, पुरुष सहभागी झाले होते.

यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन (एनआरसी) असे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहेत. या कायद्याला देशात अनेक ठिकाणी तीव्र विरोध होत आहे. केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने देशात हा कायदा लादण्याचा प्रयत्न करीत आहे. काही राज्यांनी त्यांच्या राज्यात हे कायदे लागू करण्यास स्पष्ट नकार दर्शविला आहे. देशाच्या ऐक्यास व अखंडतेस या कायद्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ताबडतोब सीएए व एनआरसी हे कायदे रद्द करावेत व राज्य सरकारने हे कायदे महाराष्ट्रात लागू होऊ देऊ नये, अशी मागणी यावेळी सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

दरम्यान, क-हाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून निषेध रॅलीस प्रारंभ झाला. रॅली मंगळवार पेठमार्गे, कन्याशाळा, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौकमार्गे नवीन प्रशासकीय इमारतपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने एनएसयूआय, एमआयएम, भीम आर्मी आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला, पुरुष सहभागी झाले होते. 

  • पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

क-हाड शहरात सीएए व एनआरसी कायद्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय संघटनांच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव, महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चातील सहभागी झालेल्यांची संख्या पाहता कोणताही अनुचित प्र्रकार घडू नये, म्हणून पोलिसांच्यावतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStrikeसंप