शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘जनता’मुळे पोस्टाचा व्यवसाय वाढला

By admin | Updated: June 2, 2016 01:00 IST

हजारो पत्रांचे वितरण : पोस्ट कार्डातून बँक उमेदवारांचा प्रचार

जावेद खान ल्ल सातारा अलीकडील काळात दूरध्वनी, मोबाईलमुळे घरी पत्र येणे दुर्मीळ झाले आहे. परंतु सध्या जिल्ह्यात जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे अनेक घरांत पत्र दिसू लागले आहे. उमेदवारांनी पत्रातून प्रचारास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोस्टमन दिसताच जनता बँकेच्या प्रचाराचे पत्र आले ही भावना नागरिकांत होऊ लागली आहे. या निवडणुकीमुळे पत्रांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. एकेकाळी संदेश देण्यासाठी पोस्ट कार्ड, पत्रांना महत्त्व होते. अनेकांच्या जीवनाचा एक भाग बनलेले हे पत्र अलीकडे दूरध्वनी, मोबाईलमुळे दुर्मीळ झाले आहे. वर्षानुवर्षे घरात पत्र येत नाही, अशी स्थिती आहे. बहुतांश लोकांच्या विस्मृतीतून पत्र ही संकल्पनाच गेली आहे. त्यामुळे पत्र लिहिणे दुर्मीळ ठरले आहे. असे असलेतरी साताऱ्यात या पत्राचा वापर मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसून आला आहे. त्याला कारण म्हणजे जनता सहकारी बँक निवडणूक गेल्या १५ दिवसांपासून जनता बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने साताऱ्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत दोन पॅनेल समोरासमोर आहेत. या निवडणुकीत सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उमेदवारांनी पोस्ट कार्डचा आधार घेतला आहे. या पत्राच्या माध्यमातून उमेदवार आपली ओळख पटवून देत आहेत. बँकेचे सुमारे १९ हजार सभासद आहेत. या सर्वांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे पत्राची शक्कल लढवत सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रात निवडणुकीचाही मजकूर आहे. सातारा शहरातील सुमारे १९ पोस्टमन सध्या उमेदवारांची पत्रे घेऊन जात आहेत. शहरातील जवळपास सर्व सभासदांना पत्राचे वाटपही झाले आहे. पोस्टमनचा वेळ वाढला... ऐरवी सकाळी साडेअकराला पत्रे घेऊन पोस्टमन बाहेर पडतात. अलीकडील काही दिवसांत जनता बँक प्रचार पत्रांमुळे पत्रे शार्टिंग करायला वेळ लागत आहे. पत्र वाटप करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या वेळेत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत दुपारी १२ च्या पुढे सर्वजण पत्रे वाटपासाठी बाहेर पडत आहेत. प्रचाराची बाजू पत्र वाटप करण्याचे काम पोस्टमनचे आहे. असे असलेतरी जनता बँक निवडणुकीच्या निमित्ताने सध्या पोस्टमन बँकेच्या उमेदवारांचे पत्र अनेक घरी वाटप करीत आहेत. एकप्रकारे जनता बँकेच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी पोस्टमननेच उचलली आहे, असा भास होत आहे.