शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुकादमाने नाकारले पैसे! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून पोटात घास; मध्यप्रदेशातील ऊसतोड मजूर 

By नितीन काळेल | Updated: December 14, 2023 20:19 IST

मध्य प्रदेशमधून सातारा जिल्ह्यात आलेल्या ऊसतोड मजुरांना मुकादमाने पैसे दिले नाहीत.

सातारा : मध्य प्रदेशमधून सातारा जिल्ह्यात आलेल्या ऊसतोड मजुरांना मुकादमाने पैसे दिले नाहीत. पोलिसांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे गरीब ६५ मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवून स्वत:सह लहान मुलांच्या पोटात दोन घास घातले. तसेच कामाचे पैसे मिळण्यासाठी आता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्जव केले आहे. याबाबत शुक्रवारी निर्णय होणार आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यप्रदेश येथून ऊस तोडणीसाठी ६५ मजूर एका मुकादमाने आणले आहेत. खटाव तालुक्यात त्यांची ऊसतोड सुरू होती. यासाठी त्यांना दिवसाला काही रक्कम देण्याचे ठरले होते. काही दिवस काम केले. त्यांना थोडे पैसे दिले. पण, नंतर पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. काम केल्यानंतर पैशाची मागणी केली असता ठेकेदाराने भांडण करुन मारहाण केली.

 यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. याबाबत ऊसतोड मजूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. तेथेही त्यांची पदरी निराशाच आली. त्यामुळे हे मजूर बायकाे-मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्याबाहेर मुक्कामी आले. त्यावेळी ‘रिपाइं’च्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर धुमाळ यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी संबंधितांची विचारपूस करुन मदत देऊ केली. तसेच याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय आणि कामगार आयुक्त कार्यालयाशीही चर्चा केली. त्यानंतर याबाबत शुक्रवारी निर्णय घेण्याचे निश्चित झाले. दरम्यान, मध्यप्रदेशातील या ऊसतोड मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवली आहे. त्यांच्याबरोबर महिला तसेच लहान मुलेही आहेत. गुरुवारी दिवसभर ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच होते. येथेच त्यांनी रात्रीचाही आसरा घेतला. मध्यप्रदेशातील काही ऊसतोड मजूर सातारा जिल्ह्यात आले आहेत. त्यांना मुकादमाने पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आसरा घेतला आहे. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालय आणि कामगार आयुक्त कार्यालयाशी चर्चा करण्यात आली. संबंधित कारखानदारही होते. ऊसतोड मजुराच्या पैशाबाबत शुक्रवारी निर्णय घेण्यात येईल. - संजय गाडे, जिल्हाध्यक्ष ‘रिपाइं’ गवई गट

टॅग्स :satara-acसातारा