शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी शर्यत रोखली; सातजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथे गावाच्या पूर्वेस असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेली बैलगाडी शर्यत रविवारी पोलिसांनी रोखली. याप्रकरणी सात जणांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वाहने जप्त केली असून, दोन बैलांनाही ताब्यात घेऊन काही वेळाने त्यांना संबंधितांच्या ताब्यात देण्यात आले.बंदी असतानाही बोरजाईवाडीत बैलगाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथे गावाच्या पूर्वेस असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेली बैलगाडी शर्यत रविवारी पोलिसांनी रोखली. याप्रकरणी सात जणांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वाहने जप्त केली असून, दोन बैलांनाही ताब्यात घेऊन काही वेळाने त्यांना संबंधितांच्या ताब्यात देण्यात आले.बंदी असतानाही बोरजाईवाडीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून प्राण्यांना निर्दयपणे व क्रूरपणे वागणूक दिली जात असल्याची माहिती काही जागरूक नागरिकांनी मंत्रालयातील बैलगाडी शर्यत प्रतिबंधक विभागाचे उच्चपदस्थ सनदी अधिकारी अनिल कटारिया व सातारा येथील पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यासोबत सोशल मीडियावर शूटिंग देखील पाठवून दिले. कटारिया व पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.म्हेत्रे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार महादेव खुडे, नाईक रियाज शेख, सचिन साळुंखे, गोरखनाथ साळुंखे, महादेव आळंदे, शिपाई किशोर भोसले व राहुल पवार यांनी बोरजाईवाडीत जाऊन डोंगराच्या पायथ्याला सुरू असलेली शर्यत बंद पाडली. तेथे खोंडांना घेऊन आलेले चार टेम्पो जप्त करण्यात आले. त्याचबरोबर एका मालकाने सोडलेला छकडा देखील ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांना पाहताच बघ्यांची पळापळ झाली.याप्रकरणी पोलिस शिपाई नीलेश येवले यांनी फिर्याद दाखल केली आहे. हवालदार शंकरराव गायकवाड तपास करीत आहेत.