आॅनलाईन लोकमतसातारा, दि. १0 : कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील मोतीचंद उपनगरामध्ये एका युवकाचा डोक्यात वीट घालून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.संतोष दशरथ गायकवाड (वय ३०, रा. बोरखळ ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मोतीचंद उपनगरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात संतोष गायकवाड याचा मृतदेह आढळून आला. मात्र त्याचा खून कोणी व कशासाठी केला, हे अद्याप समोर आले नाही. कोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून संतोषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. हा प्रकार पूर्वीच्या वादातून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
डोक्यात वीट घालून युवकाचा खून
By admin | Updated: May 10, 2017 12:00 IST