शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

By दीपक शिंदे | Updated: April 29, 2024 16:06 IST

महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकाची तुबंड गर्दी

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकाची तुबंड गर्दी होते. परंतु शुक्रवार, दि. २६ रोजी एक कुंटुब महाबळेश्वरला फिरण्यास आले होते. या दरम्यान कुटुंबातील बहीण-भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.महाबळेश्वरमध्ये एप्रिल-मे हंगामास प्रारंभ झाला असून, लाखो पर्यटक महाबळेश्वरला येऊ लागले आहेत. दिवसभर पॉइंट भ्रमंती करून सायंकाळी पर्यटक वेण्णालेक येथे नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी येतात. दरम्यान, कुटुंबातील बहीण-भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत जाब विचारला असता घोडेस्वाराने अर्वाच्य भाषेत पर्यटकास शिवीगाळ केली.

महाबळेश्वरमध्ये घोडेस्वारांना ड्रेस कोड आहे; परंतु कोणीही युनिफॉर्म घालत नाही. घोडेवाले व पर्यटक यांच्या सतत वाद होतात. घोडेवाले पर्यटकांना घोड्यावर बसवून सोडून देतात, अशावेळी घोडा अनियंत्रित होतो आणि मग अपघात होतो. जखमी पर्यटकांची कोणीही साधी दखल घेत नाही. अपघाताचे प्रमाण वाढले असून, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पालिका आणि पोलिस प्रशासन या घटनेची दखल घेत नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाबळेश्वर शहर परिसरात १५० घोडे असून, घोडेस्वारी करतेवेळी हेल्मेट सक्तीचे करावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल..अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या घटनेमुळे महाबळेश्वरच्या पर्यटनावर परिणाम होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. अशा घटना पुन:पुन्हा घडू नये, यासाठी पालिका आणि पोलिस प्रशासन यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान