शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या सर्पमित्राला कऱ्हाडचा दणका

By admin | Updated: July 21, 2016 22:52 IST

सोशल मीडियावर स्टंटबाजी : रोहन भाटे यांच्या तक्रारीनंतर वनखात्याकडून एकाला अटक

सातारा/नगर : विनापरवाना सापांना पकडून त्यांना जवळ बाळगल्याने तसेच सोशल मीडियावर सापांसमवेत स्वत:चे फोटो प्रसारित केल्याने वनविभागाने अहमदनगर तालुक्यातील नागरदेवळे येथील आकाश जाधव याला अटक केली़ कऱ्हाड येथील रोहन भाटे यांनी याबाबत तक्रार केली होती. आरोपीला तालुका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी देण्यात आली़ आकाश जाधव हा गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करत आहे़ साप व इतर वन्यप्राण्यांना पकडल्यानंतर त्यांची वनविभागात नोंद करावी लागते. तसेच ४८ तासांच्या आत त्यांना जंगलात सोडून द्यावे लागते़ आकाश जाधव याने मात्र, काही साप जवळ बाळगल्याचे व सोशल मीडियावर सापांसमवेत स्वत:चे फोटो प्रसारित केल्याची तक्रार कऱ्हाड येथील रोहन भाटे यांनी वनविभागाकडे केली होती़ या तक्रारीवरून जाधव याच्यावर कारवाई करण्यात आली. वनविभागाने दखल घेत येथील वनाधिकाऱ्यांना जाधव याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे येथून पुढे वन्यप्राण्यांबद्दल स्टंटबाजी करणाऱ्यांना चपराक बसण्यास मदत होणार आहे, हे निश्चित आहे. (प्रतिनिधी) अहमदनगर येथील सर्पमित्राने अशी अनेक ठिकाणी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. तो अंगलट आला आहे. वन्यजीव कायद्याच्या विरोधात कृती...‘सहायक वनसंरक्षक सुरेश दौंड यांच्यासह त्यांच्या पथकाने जाधव याला ताब्यात घेऊन चौकशी केली़ तसेच त्याचे फेसबुक अकौउंट तपासले असता यामध्ये जाधव याने सापांसमवेत प्रसारित केलेले छायाचित्र दिसून आले़ ही कृती वन्यजीव कायद्याच्या विरोधात असल्याने त्याला दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले़ जाधव याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली असून, पुढील चौकशी करून जाधव याच्यावर दोषारोपपत्र दाखल करणार आहे,’ असे दौंड यांनी सांगितले़