शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

नटण्यातील मुलींची मक्तेदारी मुलांनी काढली मोडून

By admin | Updated: July 13, 2014 22:28 IST

‘स्टाइल’ डोक्यावर स्वार : सुंदर दिसण्यासाठी तरुणही करू लागले पार्लरच्या वाऱ्या; ‘फंकी लूक’साठी कायपण

प्रगती जाधव-पाटील ल्ल सातारानटणं-मुरडणं ही आता केवळ तरूणींची मक्तेदारी राहिलेली नाही. दर महिन्याला ‘फंकी लूक’ देण्यासाठी तरूणही पार्लरची वारी करू लागलेत. तोच-तोच चेहरा बघून बोअर होतो म्हणून हेअर स्टाईल बदलणारे अनेक तरूण आता पावलोपावली दिसू लागले आहेत.आरशासमोर बसून तासन्तास आपलं रूप न्याहळत बसणारी आता केवळ स्त्री आहे असे नाही. आपल्य दिसण्याविषयीची काळजी आता मुलींइतकीच मुलंही घेऊ लागली आहेत. तरूण सर्वाधिक वेळ आपल्या केश रचनेवर खर्च करतात, असे दिसते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वेगळा ‘लूक’ त्यांना बदलत्या केशरचनेमुळे मिळतो. त्याबरोबरच आपल्या आवडीच्या व्यक्तीचे रूप काही दिवस सोबत मिरविण्याची त्यांना संधी मिळते. साताऱ्यसारख्या निमशहरी भागात अलीकडच्या काही काळात मुलं केशरचनेविषयी अधिक सजग होऊ लागली आहेत. त्यामुळे मुलींप्रमणेच आता मुलेही सणाला, वाढदिवसाला किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमांना आपल्या केशरचनेविषयी जागरूक आहेत. इतरांपेक्षा हटके ‘लूक’ दिसण्यसाठी आता तरूणांमध्येही चांगलीच चुरस लागली आहे. विशेष म्हणजे पूर्वीसारखं ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था आता मेन्स पार्लरमध्ये नाही. ‘अपॉइंटमेंट’ आता आवश्यक बनली आहे. पअसे असतात बारकावेकोणतीही हेअर स्टाईल चांगली करायची असेल तर केसांची तीक्ष्णता, अंत्यरूपण महत्त्वाचे असते. ज्याला या दोन गोष्टी सांभाळता येतात तो उत्कृष्ट केशरचना करू शकतो. केशरचनेच्या माध्यमातून चेहऱ्याचा ‘लूक’ बदलला जातो. यासाठी सरावही आवश्यक आहे. चेहरा आणि केसांची रचना बघून केलेली केशरचना चिरकाल दिसते व स्मरणातही राहते. प्रत्येकाच्या केसांची ठेवण वेगवेगळी असते. चेहऱ्याला शोभेल अशी केसांची रचना केली की ती आकर्षक दिसते हा अभ्यास महत्त्वाचा असतो.ंचवीस दिपालकांचा रोष... ज्या केशरचनेला तरूण ‘स्टाईल’ म्हणतात, ती केश रचना पालकांना ‘अवतार’ वाटते. म्हणूनच कोणतीही केशरचना करून घरी गेलेल्या तरूणांना पालकांच्या शाब्दिक वर्षावात चिंब व्हावे लागते. आई त्यातल्या त्यात मऊ बोलते; पण वडील म्हणजे अगदी सगळा उध्दार करतात, असे तरूण सांगतात. त्यामुळे केशररचना करून आले की खाली मान घालून सगळं ऐकायचं, अजिबात पत्युत्तर द्यायचं नाही हा ठेका तरूणांनी ठेवला आहे. या दरम्यान अगदी राग आलाच तर ‘जाऊ दे त्यांना करता येत नाही म्हणून आपल्यावर जळतात,’ असे म्हणत बोचऱ्या शब्दांचे घाव ही पोरं फुलासारखी झेलून मार्गस्थ होतात.वसांनी बदल!मुलांचे केस वाढायला किंवा त्यांनी केलेल्या हेअर स्टाईलचा लूक साधारणपणे पंचवीस दिवस टिकतो. त्यानंतर केस कापणे आवश्यक बनते. शहरातील काही मुलं तर दर पंचवीस दिवसांनी आपल्या केसांवर असे नवनवीन प्रयोग करत असतात. ज्या सेलिब्रिटीचा हेअर कट आवडेल त्याची इमेज डाऊनलोड करून पार्लरमध्ये नेले की तशी हेअरस्टाईल करून मिळते.हेअर कटचे प्रकार१ इमू जेन्टस् ही हेअर स्टाईल प्रामुख्याने नृत्यकलेशी संबंधित मुलं आणि फुटबॉल खेळाडूंना आकर्षित करणारी आहे. २लिबर्टी स्पाईक कट या हेअर कटला मॉडेल्स आणि डान्सर विशेष प्राधान्य देतात. फंकी लूक असल्यामुळे हा कट त्यांना अधिक उठून दिसतो.३ ड्रॅग्न स्पाईक कट याला टॅटू काढणारे कलाकार, ग्लॅमर जगतात असणारे पडद्यामागचे कर्मचारी याला प्राधान्य देतात.४ ग्रास स्पाईक कटला शाळकरी मुलं प्राधान्य देतात. शाळेतील नियमात बसून स्टाईल करण्याचा हा कट आहे.