सातारा: महिलेचा खून झाल्यानंतर घरात घटनास्थळी पोलीस पंचनामा करत असताना घरामध्ये दारूचा साठा पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश अरविंद साळुंखे (रा. नागठाणे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी नागठाणे येथील मालन गायकवाड (वय ५५) या महिलेचा पतीने खून केला होता. या महिलेच्या घरात पोलीस पंचनामा करत असताना पोलिसांना दारूचे बॉक्स आढळून आले. हे बॉक्स कोणाचे आहेत, असे पोलिसांनी विचारणा केल्यानंतर बबन गायकवाड याने घरात ठेवलेले बॉक्स अविनाश साळुंखे याचे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अविनाश साळुंखे याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला नोटीस बजावली आहे.