शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कर्ज प्रकरण; मोहितेंसह चौघांना जामीन

By admin | Updated: May 19, 2017 23:20 IST

बोगस कर्ज प्रकरण; मोहितेंसह चौघांना जामीन

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : बोगस कर्जप्रकरणी अटकेत असणाऱ्या कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह अन्य दोघांना शुक्रवारी येथील फौजदारी न्या. आर. एन. गोगले यांनी जामीन मंजूर केला. अटकेनंतर तब्बल ९४ दिवसांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांची मुक्तता झाली असून, या प्रकरणात आतापर्यंत अकरा जणांना जामीन मिळाला आहे. रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्जप्रकरणे झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ऊसतोडणी वाहतूकदार यशवंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी ४ आॅगस्ट २०१६ रोजी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची तसेच त्यांची वैयक्तिक कागदपत्रे कारखान्याकडे दिली होती. मात्र, त्या हंगामात संबंधित वाहतूकदारांना करारानुसार ठरलेली उचल न मिळाल्याने वाहनधारकांनी तोडणी वाहतुकीसाठी आपले वाहन लावले नाहीत. तरीही या वाहतूकदारांच्या नावे प्रत्येकी सात लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आल्याचे बँकेच्या नोटिसीनंतर समोर आले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने १३ फेब्रुवारी रोजी दोघांचाही जामीन फेटाळला. १४ फेब्रुवारी रोजी दोघांना कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिस कोठडी व पुढे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत कऱ्हाड शहर पोलिसांनी अचानक छापासत्र सुरू करून कृष्णा कारखान्याच्या माजी संचालकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. छापासत्रामध्ये सुरुवातीला आठ माजी संचालकांना अटक झाली. त्यानंतर कारखान्याच्या तत्कालीन कार्यकारी संचालकांना अटक करण्यात आली. तसेच दोन कामगारांनाही अटक झाली. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात तेरा आरोपींविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर अटकेत असणाऱ्या माजी संचालकांनी जामिनासाठी अर्ज सादर केला. त्यामध्ये प्रारंभी चारजणांना, गुरुवारी तिघांना तर शुक्रवारी अविनाश मोहिते, सुरेश पाटील, राहुल देसाई व संभाजी पाटील यांना जामीन मंजूर करण्यात आला. अद्यापही दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. बचाव पक्षाचा चार तास युक्तिवादया प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत जाधव व मोहन यादव यांनी काम पाहिले. दोन दिवसांपूर्वी अविनाश मोहिते व सुरेश पाटील यांचा जामीन अर्ज सादर करण्यात आला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीत बचाव पक्षाने सुमारे चार तास युक्तिवाद केला. त्याचवेळी सरकारी पक्षाचाही युक्तिवाद झाला होता.अन्य एका माजी संचालकालाही जामीनकृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी अटकेत असणाऱ्या अशोक जगताप (रा. वडगाव हवेली) यांनाही शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला. न्या. सी. पी. गड्डम यांच्या कोर्टात या जामिनावर सुनावणी झाली. सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी न्यायालयाने जगताप यांना जामीन मंजूर केला.