काले विभागात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे तसेच मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. त्यातच अनेक रुग्ण नारायणवाडी येथील पंत क्लिनिकमध्ये उपचार घेत असल्याची माहिती काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. यादव यांना मिळाली. त्यानंतर डॉ. यादव यांनी माहिती घेतली असता त्याठिकाणी डॉक्टर म्हणून कार्यरत असणारी महिला बोगस डॉक्टर असल्याचे समजले. त्यामुळे बुधवारी दुपारी आरोग्य विभागासह पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी सुवर्णा मोहिते ही महिला रुग्णांवर उपचार करताना रंगेहात आढळून आली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे तपास करत आहेत.
बोगस डॉक्टर महिलेला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST