शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह आपल्या व्यक्तीचा.. दु:ख मृतदेह दुसऱ्या व्यक्तीचा.. चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:59 IST

< p >महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील भीषण अपघाताने आख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. या अपघातात कोणाचे पितृछत्र हरपले तर कोणाच्या घरातील कर्ता पुरुष कायमचा निघून गेला. शनिवारी मध्यरात्री व रविवारी सकाळी दरीतून एकेक करून मृतदेह बाहेर काढण्यात येत होते. मृतदेह बाहेर येताच नातेवाइकांकडून केला जाणारा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. मृतेदह ...

<p>महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील भीषण अपघाताने आख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. या अपघातात कोणाचे पितृछत्र हरपले तर कोणाच्या घरातील कर्ता पुरुष कायमचा निघून गेला. शनिवारी मध्यरात्री व रविवारी सकाळी दरीतून एकेक करून मृतदेह बाहेर काढण्यात येत होते. मृतदेह बाहेर येताच नातेवाइकांकडून केला जाणारा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. मृतेदह नातेवाइकाचा असला अन् नसला तरी कुटुंबीयांचे डोळे मात्र अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.आंबेनळी घाटातील दाभीळ टोक येथे शनिवारी सकाळी खासगी बस दरीत कोसळून दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तीस कर्मचाºयांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना उघडकीस येताच दापोलीसह राज्यात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मृतांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता ८०० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली.मृतदेह बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नातेवाइकांकडून आक्रोश केला जात होता. मृतदेह जसे बाहेर येतील तस-तसा हा आक्रोश आणखीनच वाढत होता. नातेवाईक शनिवारी दुपारपासून धुके अन् पावसाच्या धारा झेलत घटनास्थळीच बसून होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाइकांकडून ओळख पटविली जात होती. मृतदेह नातेवाइकाचा असला अन् नसला तरी त्यांचे डोळे मात्र अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. नातेवाइकांचा हा आक्रोश पाहून ‘सह्याद्री’ही गहिवरला. एकमेकांची समजूत काढताना मदतकार्य करणाºया नागरिकांनाही आपले अश्रू अनावर झाले नाहीत.घाटातील वाहतूक बावीस तास बंदआंबेनळी घाटात झालेल्या अपघातानंतर मदतकार्य करणाºया वाहनांखेरीच पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता बंद करण्यात आलेली वाहतूक रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. दरीतील सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर तब्बल २२ तासांनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.अनेकांनी रात्र काढली जागूनरविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरीतील मदतकार्यथांबविण्यात आले. यानंतर पहाटे सहा वाजता पुन्हा सुरू करण्यात आले. मदतकार्य करणाºया एनडीआरफच्या जवानांसह,ट्रेकर्स व पोलिसांनी आख्खी रात्र जागून काढली.बस तशीच राहणार...आंबेनळी घाटातील दरीत कोसळलेली बस अक्षरश: चक्काचूर झाली आहे. बसचा केवळ सांगाडाच उरला आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी बसचा काही भाग गॅस कटरने कापण्यात आला. ही बस दरीतून बाहेर काढणार नसल्याची माहिती देण्यात आली.पोलिसांचा खडा पहाराआंबेनळी घाटातील अपघातानंतर महाबळेश्वर व पोलादापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत सर्वांनी चोवीस तास खडा पहारा दिला. तसेच वाहतूक नियंत्रणाची जबाबदारीही कर्मचाºयांनी यशस्वी पार पाडली.