शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

काळोख पसरताच घरांवर दगडांचा वर्षाव !

By admin | Updated: July 3, 2015 01:20 IST

कापील परिसर भयचकित : सुरक्षिततेसाठी ग्रामस्थांची रात्रगस्त; परिसराला भीतीने घेरले

माणिक डोंगरे-मलकापूर -कापीलसह आसपासच्या गावात व वस्त्यांवरील घरांवर काळोख पसरताच दगडांचा वर्षाव होत आहे. ३० ते ३५ जणांच्या टोळक्याने परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून, परिसर भयचकित झाला आहे. या अज्ञातांच्या दहशतीने महिला, मुलांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असून, खबरदारीसाठी ग्रामस्थांनी रात्रगस्त सुरू केली आहे.पाचवड फाट्यावर रविवारी ३० ते ३५ जणांना काही ग्रामस्थांनी पाहिले. संबंधितांमध्ये काही महिलांचाही समावेश होता. वाहनातून येऊन महामार्गावर उतरल्यानंतर संबंधित लोक गटागटाने तेथून निघून गेले. त्यानंतर कापील, गोळेश्वर, आटके, काले, धोंडेवाडी परिसरात उसाच्या शिवारामध्ये ते अनेकांना दिसले. बरमुडा व टी-शर्ट घातलेले धिप्पाड पुरुष पाहून रानात कामे करणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडत आहे. कापील-कदमवस्ती येथील बंडा कदम हे बुधवारी दुपारी ४ वाजता उसात काम करत होते. त्यावेळी अचानक उसात पाच ते सहा जणांचे टोळके असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कदम घाबरून उसातून बाहेर पडले. त्यांनी आई-वडिलांसह मित्रांना याबाबतची माहिती दिली. सर्वजण त्याठिकाणी गोळा होईपर्यंत टोळके उसाच्या रानातून पसार झाले. ही खबर वाऱ्यासारखी सर्व वस्त्यांसह कापिल परिसरात पसरली. परिसरातील २०० ते ३०० युवकांसह ग्रामस्थांनी दुपारी ४ वाजल्यापासून रात्री ७ वाजेपर्यंत सुमारे २५ ते ३० एकर शिवार पालथे घातले. मात्र, ते टोळके उसातच दडून बसले असावेत, असा कयास नागरिकांनी काढला. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वसंत देशमुख यांच्या घरावर उसातून दगडफेक करीत पाठीमागील दार ठोठावले गेले. ही माहिती मिळताच गावातील पाचशेपेक्षा जास्त ग्रामस्थ व युवक देशमुख यांच्या वस्तीवर गोळा झाले. शेताला वेढा घातला. मात्र रात्री उसाच्या शेतातून त्या अज्ञात व्यक्ती बाहेर आल्याच नाहीत. शेवटी ही खबर पोलिसांना देण्यात आली. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाचवड वस्ती व मोरे वस्तीवर माणिक मोरे व तानाजी मोरे यांच्या घरावर दगडफेक झाली. त्यामुळे ग्रामस्थांत आणखीणच दहशत पसरली. या घटनांमुळे चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. या चारही गावांत ग्रामस्थ व युवक रात्रगस्त घालत आहेत. धोंडेवाडीतही टोळीचा वावरधोंडेवाडी, ता. कऱ्हाड गावच्या शिवारातही एका शेतातील वस्तीवर हे टोळके आल्याची खबर वस्तीवरील ग्रामस्थांनी गावात दिली. गावातील २५ ते ३० युवक त्या वस्तीवर दहाच मिनिटांत पोहोचले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन संशयित उसाच्या रानात पसार झाले. दिवसा काम; रात्री जागरण रविवारपासून अनेक ठिकाणी या टोळीने धुमाकूळ घातला. मात्र दाट उसाच्या शेतीचा फायदा घेऊन ते पसार होत आहेत. वस्त्या-वस्त्यांवर जमावाने रात्र गस्त घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. रात्रीच्यावेळी जागरण व दिवसा कामे करून युवक वैतागले आहेत.दिवसाही काठ्या घेऊन प्रवास दोन्ही बाजूने उसाची शेती व मधून लहान-लहान रस्ते व पाणंद रस्त्याने प्रवास करताना युवक दिवसाही काठ्या हातात घेऊनच प्रवास करत आहेत. पाचवड, कापील, गोळेश्वर परिसरात पोलिसांची रात्रगस्त सुरू आहे. ग्रामस्थही पोलिसांना मदत करीत आहेत. सुरक्षिततेसाठी आम्ही ग्रामस्थांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. ग्रामस्थांनी घाबरू नये. कोठेही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. - राजलक्ष्मी शिवणकर,पोलीस उपअशीक्षक, कऱ्हाडरविवारपासून गावातील मळे व वस्त्यांवरील ग्रामस्थ दहशतीमुळे झोपलेले नाहीत. टोळके दिसल्याचा फोन आला की मतभेद विसरून आम्ही मदतीला धावत आहोत. जागरण व धावपळ करून युवक वैतागले आहेत. - मोहन जाधव,सरपंच, कापील चार दिवसांपासून परिसरात अज्ञातांनी चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. सारे गाव व वस्त्या रात्रभर जागरण करत आहेत. दगडफेकीच्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर रात्री पोलिसांनी दोनवेळा गस्त घातली; मात्र ते हायवे व काटपान मळा, हौदमळा पाचवड वस्तीकडेच गस्त घातली. कदम वस्ती, मोरे वस्ती, देशमुख वस्ती अशा आडरानातील वस्तीकडेही त्यांनी गस्त घालावी. - शांताराम जाधव,ग्रामस्थ, कापीलगेल्या चार दिवसांपासून अज्ञातांनी आम्हाला हैराण केले आहे. पुरुषांसह युवकांना रात्रभर जागरण करून गस्त घालावी लागत आहे. याचा कुटुंबावर चांगलाच परिणाम होत आहे. शेतात जाण्यासाठी महिला घाबरत आहेत. - स्वाती जाधव, गृहिणी, हौदमळा-कापीलदहा वस्त्यांमध्ये विखुरलं गावकापील-गोळेश्वर गावांसह विविध नावाने सुमारे १० वस्त्यांमध्ये या गावची वस्ती विस्तारलेली आहे. गेल्या पाच दिवसांपासून अज्ञातांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. संशयित दिसल्याची किंवा दगडफेक झाल्याची खबर मिळताच सर्व मतभेद विसरून पाचच मिनिटांत सर्वजण एका जागेवर गोळा होत आहेत. मोबाईलमुळे संपर्क प्रभावी रविवार पासून पाचवडवस्ती ते कापील या परिसरात उसाच्या रानातून दहा ते पंधरा जणांचे टोळके आले असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले. अशा परिस्थितीत या दहशतीचा प्रतिकार करण्यासाठी वस्त्यांसह गावातील ग्रामस्थ व युवक मोबाईलवर संपर्क करून केवळ काही मिनिटांतच एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत. काही कुटुंबे स्थलांतरित कापील गावाचा विस्तार हौद मळा, काटपान मळा, सावंत मळा, घुमट मळा, मोरे वस्ती, पाळसकर वस्ती अशा पद्धतीने लहान-लहान वस्तीमध्ये विखुरलेला आहे. एक-दोन घरांच्या वस्त्यांवरील कुटुंबांना तर गावातील घरात स्थलांतरित करण्यात आले आहे.