शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी रॉड डोक्यात मारून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:29 IST

सातारा : न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घेण्यावरून साताऱ्यातील मंगळवार तळे परिसरात शनिवारी मध्यरात्री युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली.संदीप रमेश भणगे (वय ३२, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद ऊर्फ पायलट प्रकाश कुलकर्णी (३५, रा. व्यंकटपुरा ...

सातारा : न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घेण्यावरून साताऱ्यातील मंगळवार तळे परिसरात शनिवारी मध्यरात्री युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली.संदीप रमेश भणगे (वय ३२, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद ऊर्फ पायलट प्रकाश कुलकर्णी (३५, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) याला अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या काही वर्षांपूर्वी संदीप भणगे व प्रसाद कुलकर्णी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. यात प्रसादने केलेल्या मारहाणीत संदीपच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाचा सध्या खटला सुरू आहे. हा खटला मागे घेण्यासाठी प्रसाद संदीपवर दबाव टाकत होता. त्यास संदीप नकार देत होता. दरम्यान, शनिवारी सकाळी संदीप घरातून बाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने संदीपचे वडील रात्री एकच्या सुमारास मंगळवार तळे परिसरात त्याला पाहण्यासाठी गेले. तेव्हा प्रसाद व संदीप या दोघांमध्ये वाद सुरू होता. रागाच्या भरात प्रसादने संदीपच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात संदीपच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रसादने घटनास्थळावरून पळ काढला.शाहूपुरी पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रमेश विठ्ठल भणगे (६५, व्यंकटपुरा पेठ) यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून संशयीत आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना झाली. काही तासांमध्येच आरोपी प्रसाद कुलकर्णीला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करीत आहेत.