पळशी : कोरोना काळात रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी व रक्त साठ्यात भर पडावी म्हणून मार्डी येथील वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन व बालमित्र गणेश मंडळ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी जवळपास ४८ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले.
शिबिरास मार्डी व परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदानावेळी सोशल डिस्टन्सिंग व शासकीय नियमांचे पालन करून पार करण्यात आले होते. मार्डी येथे दोन वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ उत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवानिमित्ताने वृक्षारोपण, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता याबरोबरच रक्तदान शिबिर यासारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पोळ, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विद्या काळे, सरपंच संगीता दोलताडे, उपसरपंच संजीवनी पवार, पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोहित धावड, सनी गायकवाड, साई पोळ, दीपक पाटील, चंद्रकांत पोळ, पिंटू पोळ, विजय क्षीरसागर, आकाश पोळ, वैभव रणशिंग परिश्रम घेतले.