शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जळितग्रस्त कुटुंबाच्या जखमेवर फुंकर! एकसरला मदतफेरी : ग्रामस्थांनी जमविले आठ पोती धान्य, दोन ट्रॉली चारा

By admin | Updated: May 15, 2014 00:24 IST

वाई : सध्याच्या स्पर्धेच्या युगात सगळीकडे स्वार्थ बोकाळून सर्वांना स्वत:पुरते पाहण्याची सवय जडली असतानाच वाई तालुक्यातील एकसर

 वाई : सध्याच्या स्पर्धेच्या युगात सगळीकडे स्वार्थ बोकाळून सर्वांना स्वत:पुरते पाहण्याची सवय जडली असतानाच वाई तालुक्यातील एकसर गावात संकटकाळी धावून जाण्याची सामूहिक भावना जागृत झाल्याचा प्रत्यय आला. आगीत घरसंसार उद््ध्वस्त झालेल्या कुटुंबासाठी पूर्ण गाव एकवटले आणि त्यांचा संसार सावरला. रविवारी (दि. ११) गावातील आनंदा गोळे यांच्या घराला आग लागून संपूर्ण घर भस्मसात झाले. घरातील सर्व साहित्यही खाक झाले. गोळे यांची शेती अत्यल्प. मजुरी करून घरप्रपंच चालविणारे गोळे यांनी घर बांधण्यासाठी गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून तीस हजार रुपयांचे कर्ज काढले होते. घरात भांडी-कुंडी, इतर साहित्य, धान्य भरून पुढील आयुष्याची स्वप्ने पाहत सारा सरंजाम जमवून ठेवलेला. परंतु रविवारची रात्र या कुटुंबासाठी काळरात्र ठरली. रात्री ११ वाजता सर्व कुटुंबीय टीव्हीवरचे कार्यक्रम बघत असताना घरामागची कडब्याची गंज पेटली. बघता-बघता संपूर्ण घराला आगीने वेढा घातला. प्रसंगावधान राखून सर्वजण घराबाहेर पडले; परंतु काडी-काडी करून जमविलेला संसार जळताना डोळ्यासमोर पाहण्याव्यतिरिक्त त्यांच्या हातात काहीच उरले नव्हते. सोमवारचा दिवस उजाडला, तो डोळ्यांसमोर राखेचा ढिगारा घेऊन. त्यानंतर पोलीस, तलाठी आदींनी घराचा पंचनामा केला. ग्रामस्थांनी गोळे कुटुंबीयांना मदत करण्यासाठी बैठक घेतली. गावातील सर्व तरुण आणि ग्रामस्थ बैठकीत सहभागी झाले. गोळे कुटुंबासाठी गावातून मदतफेरी काढण्याचा निर्णय झाला. तरुणांनी गावातील प्रत्येक घरात जाऊन मदतीची विनंती केली. धान्य, भांडी, कपडे, इतर वस्तू आणि चारा जमा होत राहिला. एकसरी ग्रामस्थांनी भरभरून दिले आणि अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे जगाला दाखवून दिले. मदतफेरीत उपसरपंच रघुनाथ मालुसरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण तरडे, पोलीस पाटील लडकत, नवनाथ सणस, मुकुंदा यादव, राजेंद्र येवले, जगन्नाथ घाडगे, पांडुरंग नरडे, मधुकर चव्हाण, मनोज मालुसरे, हणमंत पवार, अशोक पाटील, महेश कळंबे, सुखदेव चव्हाण आदी तरुण व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)