शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

काळ्या बछड्यांच्या वार्तेने धांदल!

By admin | Updated: October 2, 2015 23:35 IST

पोवई नाक्यावर गर्दी : मांजरं की बिबट्याच्या पिलांबाबत संभ्रम

सातारा : वन्यजीव सप्ताहाला गुरुवारी प्रारंभ झाला आणि लगेच शुक्रवारी पहाटे साताऱ्याच्या पोवई नाक्यावर दोन काळे बछडे हजर! काळे बिबटे परिसरात आहेत, याची खात्री सातारकरांना पटलेलीच आहे; मात्र हे बछडे होते, काळी मांजरं होती की अन्य कोणते प्राणी, हे गुलदस्त्यातच राहिलं आहे. या बातमीमुळं वनविभागाची धावपळ झाली खरी; पण कोणत्याही प्रसंगाला सामोरं कसं जायचं, याचं मार्गदर्शनही उपस्थितांना जागीच मिळालं! पोवई नाका हे एरवी गजबजलेलं ठिकाण. इथं आठ रस्ते एकत्र येतात. दिवसभर रहदारी आवरता आवरत नाही. अशा भागात, काँक्रीटच्या जंगलात शुक्रवारी उजाडण्यापूर्वीच चक्क काळ्या बिबट्याचे बछडे दिसले आणि ही बातमी वेगानं शहरभर पसरत गेली. पहाटे साडेपाचच्या सुमारास एका इमारतीच्या पायऱ्यांजवळ बछड्यांचं पहिलं दर्शन झालं. नंतर काहीजणांनी रस्त्याच्या एका बाजूला, तर काहींनी दुसऱ्या बाजूला त्यांना धावत जाताना पाहिलं. पूर्ण वाढ झालेल्या मांजरांएवढे हे पाहुणे बछडेच होते की काळी मांजरं, याबाबत संभ्रम निर्माण झाला. काहींनी दुरून पाहुण्यांचे फोटो मोबाइलवर टिपले. परंतु जास्त अंतर आणि अंधूक प्रकाशामुळं ‘क्लोजअप’ स्पष्ट दिसेना. व्हॉट्सअ‍ॅपवरही मेसेज फिरले आणि भल्या पहाटेच पोवई नाक्याने गर्दी अनुभवली. काळे बिबटे : पूर्वपरंपरा सातारा शहराच्या परिसरात काळ्या बिबट्यांचे दर्शन अनेकदा झालंय. पहाटे शहराजवळच्या डोंगरावर फिरायला जाणाऱ्यांना काळे बछडे दिसलेत. एक काळा बिबट्या महामार्ग ओलांडताना काही महिन्यांपूर्वीच मृत्युमुखी पडला होता. कास परिसरात काळा बिबट्या दिसला होता, त्याला दीड वर्ष लोटलं. बिबट्याच्या मादीच्या पोटी एकाच वेळी एक पिवळा आणि दुसरा काळा बछडा जन्मास येऊ शकतो, हेही सातारकरांना आता ठाऊक आहे. आक्रस्ताळेपणा नको उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. दिसलेले बछडेच असतील, तर त्यांच्या मागे-पुढे मादी असण्याची शक्यता आहे. सकाळ होण्यापूर्वी मादी बछड्यांना घेऊन निघूनही गेली असेल. मात्र, आक्रस्ताळेपणा टाळून धीरानं परिस्थिती हाताळली पाहिजे, असं अंजनकर यांनी सांगितलं. केसाची होणार डीएनएचाचणी हे शंकास्पद काळे पाहुणे जिथं दिसले, तिथं वन कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता, एक केस त्यांना सापडला आहे.डीएनए चाचणीसाठी पाठवून तो केस बिबट्याचा की मांजराचा, याचा शोध घेतला जाणार आहे