शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीत भरले काचेने रंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:34 IST

सातारा : दृक्‌श्राव्य माध्यमात क्रांती झाली अन् झोपडीतही टीव्ही दिसायला लागला; पण पंचवीस-तीस वर्षांपूर्वी रंगीत टीव्ही खूप महागडा वाटायचा. ...

सातारा : दृक्‌श्राव्य माध्यमात क्रांती झाली अन् झोपडीतही टीव्ही दिसायला लागला; पण पंचवीस-तीस वर्षांपूर्वी रंगीत टीव्ही खूप महागडा वाटायचा. त्यामुळे गावातील धनिकांच्या घरातच तो पाहायला मिळायचा. पण मुलांचा आग्रह, आपलाही ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही रंगीतच हवा, असा असायचा अन् एका काचेने ही समस्या दूर केली. कृष्णधवल टीव्ही स्क्रीनवर लावण्यासाठी काच मिळू लागली. ती चार रंगांची असल्याने, ती लावली की गरिबांचा टीव्ही पण रंगीत दिसत होता. हे काम अवघ्या तीस-चाळीस रुपयांत होत असे.

पंचवीस वर्षांपूर्वी गावोगावी दुर्मीळ असणाऱ्या लाकडी कपाटाच्या टीव्हीची बाजारात किरकोळ किंमत होती. ग्रामीण भागासह शहरी भागात पंचवीस वर्षांपूर्वी दूरदर्शनवर कार्यक्रम पाहण्यासाठी साध्या लाकडी कपाटाच्या टीव्हीचा वापर होत होता. त्या गावातील एखाद्या व्यक्तीच्या घरी तोच टीव्ही असायचा .सायंकाळी टीव्ही पाहण्यासाठी संपूर्ण गाव गोळा होत होता आणि गावात ग्रामपंचायतीने टीव्ही खरेदी केले होते. दररोज सायंकाळी बातम्यांसाठी टीव्ही लावला जात होता. कालांतराने नवीन तंत्रज्ञान आले, टीव्हीमध्ये अनेक बदल झाले.

ज्या लोकांना टीव्हीला काच लावणे शक्य नव्हते, असे लोक अगदी एक-दोन रुपयांत बाजारात मिळणारा जिलेटिनचा रंगीत कागद टीव्हीच्या काचेला चिकटवून कलर टीव्हीचा आनंद घेत होते. लाल, निळा, पिवळा, हिरवा अशा रंगांचे जिलेटिनचे कागद पूर्वी भेटवस्तूच्या सजावटीसाठी वापरले जात होते. हे कागदही नव्वदीच्या दशकात अनेकांना आनंद देऊन गेले.

दरम्यानच्या काळात बहुतांशजणांच्या घरात कलर टीव्ही आले. मात्र, गरिबांच्या घरात ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच होते. आपल्याही घरात कलर टीव्ही असायला हवा, असे अनेकांना वाटत असे. पण त्यावर शोध लागला. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कलर दिसण्यासाठी बाजारात मल्टिकलरच्या काचा आल्या. ती काच ब्लॅक अँड टीव्हीसमोर लावली की, टीव्ही रंगीत दिसू लागला. तसेच काहीजण डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून निळ्या रंगाची काच वापरायचे.

चौकट..

धूळ जाऊ नये म्हणून प्लास्टिकच्या कव्हरचा वापर...

ग्रामीण भागात फारशा लोकांच्या घरात टीव्ही नव्हते. मात्र, ज्यांच्या घरात टीव्ही असायचा, ते लोक त्याला खूप जपायचे. काहींच्या घरात लाकडी शटरचे टीव्ही असायचे. मालिका, सिनेमा पाहून झाल्यानंतर टीव्हीचे शटर बंद करून ठेवायचे; कारण त्यामध्ये धूळ, कचरा जाऊ नये म्हणून. त्याची खूप काळजी घेतली जायची. ज्यांच्याकडे शटरचा टीव्ही नव्हता, असे लोक टीव्हीवर झाकण्यासाठी कापडी किंवा प्लास्टिकच्या कव्हरचा वापर करू लागले. त्या कव्हरला दोन्ही बाजूला चेन असायची. त्यामुळे टीव्हीच्या स्क्रीनवर धूळ बसत नसे.

फोटो..

13टीव्ही01/02