पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने भारत बंदमध्ये सहभाग दर्शविला होता. त्यानिमित्त झालेल्या बैठकीत सत्यजितसिंह पाटणकर बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अॅड. अविनाश जानुगडे, नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय उर्फ बापू टोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, गत काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर तब्बल पाचशेहून अधिक शेतकरी संघटनांचे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत याच आंदोलनात तीनशेहून अधिक शेतकऱ्यांचा नाहक बळी जाऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. तरीही केंद्र सरकारला त्यांची दया येत नाही. याशिवाय पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले. जनविरोधी निर्णय, कामगार कायद्यातील बदलाने कामगार देशोधडीला लावण्याचे केंद्राचे धोरण असून आम्ही त्याचा निषेध करतो.
यावेळी शंकरराव शेडगे, सुभाषराव पवार, गुरुदेव शेडगे, स्नेहल जाधव, शोभा कदम, दीपकसिंह पाटणकर, संजय चव्हाण, दीपक शिंदे, राजेंद्र राऊत उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तहसीलदार योगेश टोम्पे यांना मान्यवरांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
फोटो : ०४केआरडी०३
कॅप्शन : पाटण येथे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन तहसीलदार योगेश टोम्पे यांना देण्यात आले.