शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात 'पक्षचिन्ह' अन् नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अडले घोडे

By सचिन काकडे | Updated: November 7, 2025 19:31 IST

Local Body Election: आघाडीत नाही रस : पक्षचिन्हावर निवडणुकीसाठी आग्रही

सचिन काकडेसातारा : नगरपालिका निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना, साताऱ्यातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा गुंता अजूनही सुटलेला नाही. राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने यंदा सातारा नगरपालिकेची निवडणूक थेट ‘पक्ष चिन्हावर’ लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत साताऱ्यातील दोन्ही आघाड्यांकडून अद्याप निर्णय न झाल्यानेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा गुंताही सुटलेला नाही.

भाजपची नवीन खेळी ?

  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपने आपली क्षमता वाढविली आहे. जिल्ह्यात आठपैकी चार आमदार आणि खासदारपद भाजपकडे आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते साताऱ्याच्या राजकारणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. दोन ‘राजें’चे सत्ताकेंद्र असलेल्या या पालिकेवर भाजप विचाराचा नगराध्यक्ष निवडून यावा, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे.
  • भाजपने नगराध्यक्षपदासाठी ‘एका’ नावाचा विचार केल्याची चर्चा आहे, मात्र ते नाव अद्याप गोपनीय आहे.
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, ‘पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या पद्धतीने नगरपालिकेचा निर्णय घेतला जाईल,’ असे सूचक विधान करत अधिक बोलणे टाळले आहे. यामुळे भाजपच्या या राजनीतीला जाणकारांकडून दुजोरा मिळत आहे. 

पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्यांचा ‘फॅक्टर’

  • जिल्ह्यातील पालिकांचा आजवरचा इतिहास पाहता, बहुतांश निवडणुका या राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून लढविल्या गेल्या आहेत; कारण हाच फॉर्म्युला निवडणुकीत यशस्वी होत आला आहे. त्यामुळे यंदाही उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीतील पदाधिकारी ‘स्थानिक’ पातळीवर निवडणूक लढविण्यास अनुकूल आहेत.
  • येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना गती येणार असून, सातारा नगरपालिकेची निवडणूक पक्ष चिन्हावर होणार की स्थानिक आघाड्या जागांची वाटाघाटी करून ‘मैत्रीपूर्ण लढत’ देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, भाजपची भूमिकाही तितकीच निर्णायक ठरणार आहे.