शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात भाजपकडून शिंदेसेनेची कोंडी, स्वबळावर निवडणुकीची रणनीती

By हणमंत पाटील | Updated: June 14, 2025 15:24 IST

विरोधकांना बळ, भाजपने मुंबई व पुणे या महानगरानंतर सातारा व सांगली जिल्ह्याकडे मोर्चा वळविला

हणमंत पाटीलसातारा : लोकसभा व विधानसभेला महायुतीचा धर्म पाळणाऱ्या भाजपने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती बदलली आहे. मुंबई, पुण्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांना भाजपने प्रवेश दिला. त्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची त्यांच्याच जिल्ह्यात कोंडी करण्याची भाजपची रणनीती असल्याचे दिसून येते.केंद्र व राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता आहे. तसेच, शत-प्रतिशत भाजप हा पक्षाचा नारा आहे. त्यामुळे भाजपने तळागाळात पोहोचण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त साधला आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनाचे आदेश आले आहेत. त्यामुळे भाजपने मुंबई व पुणे या महानगरानंतर सातारा व सांगली जिल्ह्याकडे मोर्चा वळविला आहे.गेल्या ४५ वर्षांपासून साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाईसत्यजितसिंह पाटणकर ही दोन्ही घराणी एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. १९८० मध्ये तत्कालीन आमदार बाळासाहेब देसाई यांच्याविरोधात विक्रमसिंह पाटणकर यांनी पहिल्यांदा बंडखोरी केली. तेव्हापासून पाटण विधानसभा निवडणूक देसाई विरुद्ध पाटणकर अशी लढत सुरू आहे.सध्या शिंदेसेनेचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात २०२४ ची विधानसभा निवडणूक पाटणकर यांनी लढविली. आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘आम्ही गुहावटी मार्गे भाजपसोबत आलो नाही,’ अशी जहरी टीका त्यांनी देसाई यांच्यावर केली. त्यामुळे पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीत रंगण्याची शक्यता आहे.

नेत्यांना भेटल्यानंतर भूमिका मांडणार : शंभूराज देसाईआमचे तीन पिढ्यांचे राजकीय मतभेद आहेत. तरीही त्यांचा महायुतीतील मोठ्या पक्षात प्रवेश झाला. मी शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. मला जे बोलवायचे आहे, ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब व आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावर घालणार आहे. या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर माझी भूमिका मांडणार आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

जिल्ह्यातील महायुतीचे विधानसभेचे संख्याबळ

  • भाजप : ४ आमदार (दोन मंत्री)
  • राष्ट्रवादी (अजित पवार) : २ आमदार (एक मंत्री)
  • शिंदेसेना : २ आमदार (एक मंत्री)