शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काळी बाहुली बांधून झाडावर घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:31 IST

सातारा : पुण्यातील ‘अंघोळीची गोळी’ संस्थेने साताऱ्यात येऊन झाडांना खिळेमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. तर त्याचवेळी दुसरीकडे अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर झाडाच्या बुंधक्याला काळी बाहुली बांधून कुºहाडीचे घाव घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.सातारा अजिंक्यतारा, यवतेश्वरच्या कुशीत वसलेला आहे. या डोंगरावर गर्द झाडी लाभली आहे. त्याचप्रमाणे ...

सातारा : पुण्यातील ‘अंघोळीची गोळी’ संस्थेने साताऱ्यात येऊन झाडांना खिळेमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. तर त्याचवेळी दुसरीकडे अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर झाडाच्या बुंधक्याला काळी बाहुली बांधून कुºहाडीचे घाव घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.सातारा अजिंक्यतारा, यवतेश्वरच्या कुशीत वसलेला आहे. या डोंगरावर गर्द झाडी लाभली आहे. त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील दुर्मीळ प्राणी, पशुपक्षी या डोंगरात पाहायला मिळतात. यामुळे हा परिसर नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध म्हणून ओळखला जातो. अजिंक्यतारा, कास पठार, सज्जनगड पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून पर्यटक, भाविक येतात. अन् येथील निसर्गसंपन्न परिसर पाहून पुन्हा येण्याचा संकल्प करतात.या निसर्गावर विघ्नसंतोषी मंडळींची वक्रदृष्टी अधूनमधून पडत असते. या डोंगरात जनावरे राखायला जाणाºयांकडून वाळलेले गवत पेटवण्याचे प्रकार वारंवार घडतात. अख्खा डोंगर वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडतो. दुर्मीळ वनस्पती जळून जाते. असंख्य पशुपक्षी मृत्युमुखी पडतात.हे कमी म्हणून की काय अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगरात अनोखा प्रकार उघडकीस आला. चारभिंतीपासून मंगळाई देवीच्या मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर झाडी वाढलेली आहे. त्यातील एका झाडाच्या बुंधक्याला काळी बाहुली बांधलेली असून, त्यावर कुºहाडीने घाव घालण्यात आले आहेत. या घावामुळे निम्म्यातून झाड पडलेले आहे.वाई तालुक्यातील मांढरगडावरही झाडांना काळ्या बाहुल्या बांधल्या जात होत्या. पण आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राजधानीत चक्क झाडाला काळी बाहुली बांधून कुºहाड चालविण्याचा प्रकार घडला आहे. डोंगरावर फिरायला जाणाºया मंडळींना हा प्रकार दिसला. या प्रकारामुळे सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत वेळीच मार्ग काढण्याची मागणी होत आहे.सर्व लाकडं जागेवरजंगलात अनेकदा जळणासाठी झाड तोडली जातात; पण अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर कुºहाडीने झाड तोडले असताना एकही लाकूड हलविलेले नाही. त्यामुळे या प्रकारामुळे संशय व्यक्त होत आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाºया पद्धतीवरच घाव घालण्याची मागणी होत आहे.