शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बामणोलीच्या बफरमध्ये बिबट्याची शिकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:02 IST

बामणोलीच्या बफर क्षेत्रात दहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

क-हाड (जि. सातारा) : बामणोलीच्या बफर क्षेत्रात दहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेने वन्यजीव विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असून, प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र असलेल्या वलवण (ता. महाबळेश्वर ) गावच्या हद्दीत ५ एप्रिल २०१९ रोजी वनमजूरांना गस्त घालताना बिबट्या मृतावस्थेत दिसला. या घटनेची माहिती वन्यजीव अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्याच रात्री उशिरा वन्यजीवचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बिबट्याचे अवशेष ताब्यात घेतले.संबंधित बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक आहे की त्याची शिकार झाली, याबाबत गत काही दिवसांपासून तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, त्याची शिकार झाल्याची खात्रीशीर माहिती लोकमतला उपलब्ध झाली आहे. बामणोलीच्या वनहद्दीत गत अनेक दिवसांपासून शिकारी टोळ्यांचा वावर आहे. त्यांनी शिकार केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.>झाडावर मचाण कुणी घातलं?वलवणमध्ये ज्याठिकाणी बिबट्या मृतावस्थेत आढळला त्याचठिकाणी एका झाडावर मचाण बांधण्यात आल्याचं समोर आलंय. ते मचाण कोणी आणि कशासाठी बांधलं, याचा तपास वन्यजीव विभागाने केला का? असाही प्रश्न आहे. अशा पद्धतीची मचाण शिकारीसाठी बांधली जातात. त्यामुळे वलवणमध्ये आढळलेलं ते मचाण शिकारीसाठीचं बांधलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.>बामणोली रेंजमध्ये वलवणच्या हद्दीत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा मृत्यू नैसर्गिकही असू शकतो किंवा त्याची शिकारही झाली असावी. या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास करीत आहोत.- पी. ए. शिंदे, वनक्षेत्रपाल

टॅग्स :leopardबिबट्या