शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आधीच आजार त्यात बिलांचा बाजार

By admin | Updated: February 15, 2015 23:42 IST

पाटण तालुका : खासगी रुग्णालयांकडून होतेय लूट; रुग्णांवर कर्जबाजारीची वेळ

पाटण : तालुक्याच्या मानाने पाटणच्या दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी, अशी येथील सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, या इच्छापूर्तीसाठी लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणेने लक्ष घालून तालुक्यातील खासगी रुग्णालयांना चाप बसवने गरजे आहे. मात्र अजून तसे झाल्याचे दिसत नसल्यामुळे पाटण तालुक्यातील खासगी रुग्णालयात अक्षरश: रुग्णांची लूट होताना दिसत आहे. रुग्णांची उपचार झाल्याची बिले भागविताना कर्जबाजारी होण्याची वेळ संबंधित कुटुंबांवर आल्याचे किती तरी प्रसंग समोर आले आहेत.तालुक्यातील खासगी दवाखान्यात जाल तर केस पेपर आणि इतर तपासण्या व मेडिकलचा खर्च भागविताना रुग्णांना नाकीनऊ आल्याशिवाय सुटका नाही. आणि आजार जर गंभीर असेल तर ५ हजार ते १० हजारांचे बिल रुग्णालयात भरल्याशिवाय तुम्ही घरी जाऊ शकत नाही. एकदा का तुम्ही या खासगी वैद्यकीय सेवेच्या कचाट्यात सापडला की रुग्णाची बिले भागविताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहात नाहीत. रात्री-अपरात्री जर घरातील व्यक्तींची प्रकृती अतिगंभीर असेल तर मोठा कठीण प्रसंग पाटणच्या जनतेवर उद्भवतो. एक तर अशावेळी पाटण तालुक्यातील खासगी दवाखाने दरवाजा उघडत नाहीत आणि जर उघडलाच तर नाईट चार्ज दुप्पट आणि ‘मूँह माँगी’ किंमत मोजावी लागते. या विळख्यातून सोडविण्यासाठी पाटणच्या जनतेला वाली हवा आहे.खासगी दवाखान्यांना त्यांनी दिलेल्या वैद्यकीय सेवेचा योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे. मात्र, त्याही जर लुटालूट चालू असेल तर या अशावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा जागरुक कधी होणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (प्रतिनिधी)लॅबोरटरीवाले तर सर्वात पुढेरुग्णांचे रक्त किंवा लघवी तपासणी करावयाचे असेल तर खासगी रुग्णालयांशी अशा लॅबवाल्यांची साखळी असते. त्यांना लगेच संपर्क केला जातो. लॅबवाले येतात, गरजेप्रमाणे रक्त, लघवी व इतर तपासण्यासाठी नमुने नेतात. मात्र त्याचा रिपोर्ट येण्याआधी किमान ७०० रुपये व त्यापुढे फी घेतात. तिथेच रुग्णांचे नातेवाईक हतबल होतात. त्यानंतर मग डॉक्टरांचा बिल किती होणार, याची चिंता लागून राहते.शासनाने खासगी दवाखान्यांसाठी मेडिकल इम्प्लेमेंटरी बिल अ‍ॅक्ट निर्माण केला आहे. त्याची अद्याप अंमलबजावणी नाही. त्यानुसार रुग्णांच्या तपासण्या व औषधांचे दर दवाखान्यांनी फलकांवर लावले पाहिजेत, असा नियम आहे. तरीसुध्दा खासगी दवाखान्यांनी माणुसकीच्या भावनेतून रुग्णांचे बिल आकारावे.डॉ. दीपक साळुंखे, वैद्यकीय अधिकारी , पाटणपाटणच्या रुग्णांसाठी कराड येथील डॉक्टरांची यादी पाटणच्या डॉक्टरांजवळ असते. त्यामुळे रुग्ण आपल्या हाताबाहरे असल्याचे दिसतात. पाटणमधून कराडच्या डॉक्टरांची चिठ्ठी मिळते, तिथे रुग्ण तातडीने हलविण्याचे सल्ले दिले जातात. पाटण तालुक्यातील हजारो रुग्ण कऱ्हाडला नेले जातात. ही प्रथाच पडली आहे. मग कराडचा खर्च तर विचारायलाच नको.