साताराः शहरालगत असणाऱ्या संभाजीनगर येथून सात हजार रुपये किमतीची सायकल चोरीला गेली असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, धनंजय परशुराम माने (वय ४६, रा.गोकुळधाम अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, देगाव रोड, संभाजीनगर, सातारा) यांचा मुलगा पुष्कर याची सायकल दि.२७ ते २८ ऑक्टोबर, २०२० या कालावधीत चोरीला गेली. याबाबतची तक्रार त्यांनी सोमवार, दि.२९ मार्च रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलांकडून चोरीच्या १३ सायकली जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा सातारा शहर व परिसरात सायकल चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.